शेजारच्या श्रीलंकेशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध हे रामसेतूच्या काळापासून इतके प्राचीन आहेत. देशाची १२ टक्के तामिळ लोकसंख्या आणि देशाची एकता आणि एकात्मिकता यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय शांतिसेनेने केलेला त्याग यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील बंध आणखी पक्के झाले आहेत.
तामिळ वाघांच्या दहशतवादावर विजय मिळाल्यानंतर, राजपक्षे यांना आपल्याला कुणी विरोधक नाहीत, याचा विश्वास वाटू लागला. पण २०१५ मध्ये त्यांनी आपल्या पराभवासाठी भारताला दोष दिला.
महिंद्रा राजपक्षे यांचे बंधु गोताबाया राजपक्षे यांचा नुकत्याच श्रीलंकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत झालेला विजय आणि महिंद्रा यांची देशाच्या पंतप्रधानपदी झालेली नियुक्ती यामुळे दिल्ली आणि कोलंबो यांच्यातील संबंधांबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहेत. पण वास्तव ओळखून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या माध्यमातून गोताबाया यांच्या शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी दिलेले निमंत्रण आ सणि श्रीलंकेच्या अध्यक्षांची भारत भेट यामुळे राजकीय वातावरण स्वच्छ झाले आहे.
द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा इरादा जाहीर करून, गोताबाया यांनी, भारताची सुरक्षा धोक्यात येईल, असे काही करण्याची आपली इच्छा नाही, असे स्पष्ट केले आणि सर्व शंका आणि गैरसमज दूर केले. आपल्या देशातील चीनी गुंतवणुकीला भारत आणि इतर देशांनी पर्याय दाखवावा, अशीही त्यांची इच्छा होती.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ३६० कोटी रूपयांच्या मदतीचे आश्वासन आणि २८७० कोटी रूपयांचे कर्ज, यासह भारताने जुन्या संबंधांचे स्थिरपणे पुनरूज्जीवन करून मजबूत करण्याची वेळ आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत श्रीलंकेच्या समाजातील विविध थरांना वाटणाऱ्या भीतीचा आरसा दिसला. गेल्या वर्षी माजी अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी देशाला असुरक्षित करून तसेच देशाची संरक्षण व्यवस्था कमजोर करून राजकीय पेचप्रसंग निर्माण केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विक्रमसिंघे पंतप्रधान झाले असले तरीही. ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या भयानक बाँबस्फोटांनी संपूर्ण देशाला औदासिन्यात ढकलले. संसदीय निवड समितीने भारत आणि अमेरिकेने बांबहल्ले होण्याचा इषारा दिला होता, त्यानंतरही सुरक्षा यंत्रणांनी निष्क्रीयता दाखवल्याबद्दल दोष दिला आहे.
सिंहला बहुसंख्यांकांना गोताबाया हेच नव्याने उदयास येत असलेल्या आयएस दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी योग्य व्यक्ती आहेत, असा विश्वास वाटतो. उत्तर आणि पूर्वेकडील प्रांतातील तामिळ आणि मुस्लीम बहुसंख्यांकांची पसंती गोताबाया यांचे प्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा यांना आहे. कारण दहशतवाद नियंत्रणात आणण्याच्या नावाखाली त्यांना आपल्या सुरक्षेवर गदा येईल, याची भीती वाटते.