जमियत उलेमा-इ-इस्लाम (जेयुआय-एफ) या पाकिस्तानातील प्रमुख धार्मिक पक्षाचे नेते मौलाना फझलूर रेहमान, ज्यांना अत्यंत अस्थिर अशा प्रदेशातील सर्वाधिक प्रागतिक आणि लवचिक नेते म्हणून गणले जाते, त्यांनी २७ ऑक्टोबरला पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात आझादी(स्वातंत्र्य) मोर्चाचे नेतृत्व केले आणि इस्लामबादमध्ये या मोर्चामध्ये दोन लाख अनुयायी जमले होते, असे अनुमानित करण्यात आले आहे. पंतप्रधान खान यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण, ज्या २०१८ च्या निवडणुकीने त्यांना सत्तेकडे झपाट्याने नेले, ती निवडणूक गैरप्रकार करून जिंकली होती, अशी मागणी मौलानांनी केली होती.
शनिवारी (९ नोव्हेंबर) या आझादी मोर्चाला दोन आठवडे लोटले आणि कुंठीत अवस्था कायम आहे. इम्रान सरकारने विरोधी रेह्बर समितीच्या मध्यस्थांशी सुरू केलेल्या वाटाघाटी अपूर्ण असून तुफानी पाऊस आणि प्रचंड थंडीच्या रात्री अशा खराब हवामानामुळे काही स्थानिक सहभागी लोक घरी परतल्याचे दिसते. देशांतर्गत विश्लेषकांनी हा मोर्चा म्हणजे फुसका बार असे वर्णन केले असले आणि फझलूर रेहमान यांनी दिलेले आव्हान किरकोळ ठरवले असले तरीही अधिक वस्तुनिष्ठ विश्लेषण नेमके उलट सुचवते आहे. सध्या पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्ष, पीएमएल-एन(पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ)आणि पीपीपी(पाकिस्तान पीपल्स पार्टी) हे वेगवेगळ्या प्रकारे विस्कळीत अवस्थेत आहेत कारण, माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्याहीपुढे, नवाझ शरीफ अत्यंत आजारी असून त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले आहे कारण, अशा बातम्या आहेत की, त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी परदेशात विमानाने नेण्यात येणार आहे. पीएमएल-एनमध्ये नवाझ शरीफ यांचे बंधू आणि मुलीमध्ये नेतृत्वावरून संघर्षाचा अंतर्प्रवाहही आहे, हेही स्पष्ट आहे. शरीफ यांच्या कन्या मरियम या योग्य वेळी पीएमएल-एनच्या नेतृत्वाची सूत्रे स्वीकारतील, असे अनुमान आहे.
पीपीपी हा पक्षसुद्धा विषम एकत्रीकरणाच्या अवस्थेत आहे. थोरले झरदारी यांनाही आरोग्याच्या समस्या आहेत आणि सर्वोच्च पदावर असताना आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपांबद्दल त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांचे पुत्र बिलावल भुत्तो, ज्यांच्यावर आपली माता बेनझीर आणि आजोबा झुल्फिकार अली भुत्तो यांची राजकीय छाया आहे, पाकिस्तानच्या गोंधळाची स्थिती असलेल्या राजकारणाच्या मर्यादेत, ज्याचे काळजीपूर्वक व्यवस्थापन रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयाकडून केले जात आहे, अशा वातावरणात पक्षाची गेलेली विश्वासार्हता हळूहळू मिळवत आहेत.
या संदर्भात, फझलूर रेहमान यांना पाकिस्तानातील प्रचलित राजकीय परिप्रेक्ष्यात आपले महत्व प्रस्थापित करण्याचीच नव्हे तर आपल्या प्रांतातील कट्टर प्रतिस्पर्धी इम्रान खान यांचा बदला घेण्याची संधी दिसली.
येथे याचे स्मरण करणे उचित होईल की, रेहमान यांची नियुक्ती जेयुआयच्या अमीरपदावर १९८० मध्ये, त्यांच्या वडलांची निधन झाल्यावर आणि ते २७ वर्षाचे असताना झाली होती आणि डेरा इस्माइल खान हा खैबर पख्तूनवाला प्रांतातील जिल्हा त्यांचा बालेकिल्ला होता-जो त्यांना त्यांच्या वडलांकडून वारसा हक्काने मिळाला. बलुचिस्तान प्रांतात रेहमान यांनाही पश्तून भागांमध्ये जनाधार आहे.
या उलट, इम्रान खान यांनी १९९६ मध्ये राजकारणात प्रवेश केला जेव्हा त्यांनी पीटीआय(पाकिस्तान तेहरिक-इ-इन्साफ) हा पक्ष स्थापन केला आणि तुलनेने अगदी थोड्या कालावधीत, केपीमध्ये अधिक विश्वासार्ह व्यक्ती म्हणून उदयास आले. जखमेवर मीठ तेव्हा चोळले गेले जेव्हा, २०१८ च्या निवडणुकीत, रेहमान अन त्यांचा पक्ष प्रथमच पूर्णपणे पराभूत झाला आणि तुलनेत नवीन असलेल्या इम्रान खान यांनी केपीच्या पूर्वाश्रमीच्या सिंहाला हद्दपार केले.