महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बालाकोटनंतर पाक हादरलाय, हवाई क्षेत्र खुले करण्यास नकार

'भारत सरकारने आमच्याशी संपर्क साधून हवाई क्षेत्र खुले करण्याची मागणी केली होती. आम्ही त्यांना आमची बाजू सांगितली,' असे नुसरत यांनी समितीला सांगितले.

पाकिस्तान

By

Published : Jul 13, 2019, 3:29 PM IST

इस्लामाबाद - बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारतीय वायुसेनेने आपल्या हवाई तळांवर लढाऊ विमाने तैनात ठेवली आहेत. त्यामुळे पाकिस्तानने त्यांचे हवाई क्षेत्र खुले करण्यास नकार दिला आहे. जोवर भारत या तळांवरील लढाऊ विमाने हटवत नाही, तोवर भारताच्या व्यापारी विमांनाच्या वाहतुकीसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र खुले करण्यात येणार नाही, असे पाकने म्हटले आहे. पाकचे विमानन सचिव शाहरुख नुसरत यांनी संसदीय समितीला ही माहिती दिली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने कारवाई केली होती. त्यानंतर पाकिस्तानने २६ फेब्रुवारीला आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले होते. स्थानिक वत्तवाहिनीच्या माहितीनुसार विमानन सचिव नुसरत यांनी स्थायी समितीला ही माहिती दिली. जोवर भारत या तळांवरील लढाऊ विमाने हटवत नाही, तोवर भारताच्या व्यापारी विमांनाच्या वाहतुकीसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र खुले करण्यात येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

'भारत सरकारने आमच्याशी संपर्क साधून हवाई क्षेत्र खुले करण्याची मागणी केली होती. आम्ही त्यांना आमची बाजू सांगितली,' असे नुसरत यांनी समितीला सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details