काबुल - तालिबानींच्या राजवटीत अफगाणिस्तानमधील जनता भूक आणि गरिबीशी संघर्ष करत ( humanitarian crisis in Afghanistan ) आहे. भूकेने व्याकूळ झालेल्या लोकांनी आपल्याच मुलांची विक्री सुरू केली आहे. आता, तर चक्क लोकांनी किडनी विकण्यास ( kidneys in the Afgans black market ) सुरुवात केली आहे.
अफगाणिस्तानमधील माध्यमाच्या माहितीनुसार अफगाणिस्तानात अवयव विक्री करणे बेकायदेशीर आहे. तरीही अवयवांची विक्रीचा काळाबाजार सुरू आहे. हेरान प्रांतामधील काही लोकांनी पोट भरण्यासाठी किडनी विकण्याचा मार्ग ( Kindney sale due to poverty ) निवडला आहे. इंजिल जिल्ह्यातील काही लोकांनी काळ्या बाजारात किडनी विकली आहे. त्यामद्ये कमी वयाचे लोक आणि महिलांचा समावेश आहे.
निधी संपल्याने अफगाणिस्तानपुढे मोठे आर्थिक संकट
जर कोणी मुलांसाठी खायला पैसे देत असेल तर किडनी विकण्यासाठी लोकांना अडचण नसल्याचे एका स्थानिकाने सांगितले. अवयव विक्री करणे अवैध असल्याचेही त्यांना माहित आहे. मात्र, देशातील महागाईमुळे त्यांच्यापुढे पर्याय नाही. ऑगस्ट महिन्यात तालिबानी लोकांनी अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. त्यानंतर अफगाणिस्तानमधील लोकांची आर्थिक स्थिती बिघडण्यास सुरुवात झाली आहे. तालिबानी सरकारने मानवाधिकाराचे पालन केले नसल्याने त्यांना आंतरराष्ट्रीय मदत मिळ शकत नाही. विश्व बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि युएस फेडरल रिझर्व्हने दिलेला निधी संपल्याने अफगाणिस्तानपुढे मोठे आर्थिक संकट आहे.
हेही वाचा-Iphone SE : आता कमी किंमतीत 5G सपोर्टसह मिळणार आयफोन; एप्रिलमध्ये होऊ शकतो लॉंच