काबुल -अफगाणिस्तानात तालिबानच्या १२ दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. अफगाण सुरक्षा दलांनी त्यांच्या तावडीतून बाघलान प्रांतातील १६ ग्रामस्थांची सुटका केली आहे.
तालिबानचे १२ दहशतवादी ठार, बाघलान प्रांतातील १६ ग्रामस्थांची सुटका - afgan army operation in baghlan province
तालिबानचा वरिष्ठ कमांडर कारी बख्तयारसह २४ हून अधिक दहशतवादी या कारवाईत जखमी झाले. तालिबानी गटाचा प्रवक्ता झबीदुल्लाह मुजाहिद याने लष्कराचे दावे फेटाळून लावले आहेत. उलट या कारवाईत लष्कराचेच नुकसान झाल्याचे त्याने म्हटले आहे.
तालिबान
बाघलान प्रांतात १६ ऑक्टोबरला तालिबानी दहशतवाद्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. डंड-ए-घोरी, डंड-ए-शाहबुदीन, किलागाई या भागांमधून या नागरिकांची सुटका करण्यात आली. लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिल्याचे वृत्त स्थानिक वृत्तसंस्थेने दिले आहे.