महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

तालिबानच्या क्रुरतेची कहाणीः महिलांच्या मृतदेहाबरोबर बलात्कार करतात -मुस्कान यांची माहिती - Afghan Woman

अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या एका महिलेने तालिबानच्या क्रुरतेची माहिती दिली. हे ऐकूण तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल. तालिबानी महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात, असे तीने सांगितले. मुस्कान, असं या महिलेचं नाव आहे.

Afghan Woman Reveals Taliban Had Sex with Dead Bodies
तालिबानच्या क्रुरतेची कहाणी; महिलांच्या मृतदेहाबरोबर बलात्कार करतात

By

Published : Aug 23, 2021, 2:27 PM IST

Updated : Aug 23, 2021, 2:36 PM IST

काबूल - अफगाणिस्तान तालिबानी राजवटी खाली आले असून तेथील नागरिक देश सोडून पळत आहेत. भारतात आलेल्या एका महिलेने तालिबानच्या क्रुरतेची माहिती दिली. हे ऐकूण तुमच्या पायाखालची जमीन हादरून जाईल. तालिबानी महिलांच्या प्रेतावरही बलात्कार करतात, असे तीने सांगितले. मुस्कान, असं या महिलेचं नाव आहे.

अफगाणिस्तानमध्ये ही महिला पोलीस अधिकारी होती. एका वृत्त वाहिनीशी बोलताना महिलेने आपल्या वेदना व्यक्त केल्या. तालिबान्यांनी आपल्या घरी येऊन धमक्या दिल्याचे तीने सांगितले. पोलिसांत काम करणे थांबवले नाही, तर कुटुंबीयांना संपवण्याची धमकी त्यांनी दिली होती, असे मुस्कान यांनी सांगितले.

यापूर्वी 2018 मध्ये भारतात आलेल्या अफगाण महिलेने सांगितले होते, की तिचे वडिल पोलिसांत काम करत असल्यामुळे त्यांनी तालिबान्यांनी ठार केले होते. तसेच तिचे काका अफगाण सैन्यात डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडत होते. तर त्यांचीही तालिबान्यांनी हत्या केली होती.

भयावह स्थिती -

तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व देश आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानने रविवारी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून तेथे अराजकतेचे वातावरण आहे.

मुला-मुलींचे सहशिक्षण बंद -

अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तालिबानने आपला पहिला "फतवा" जारी करत हेरात प्रांतात मुला-मुलींचे सहशिक्षण बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता तालिबानच्या अधिपत्याखालील नव्या अफगाणिस्तानात नागरिकांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागेल याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, तालिबानवर ताबा मिळविल्यानंतर महिलांच्या अधिकारांचे संरक्षण आणि आदर केला जाईल असे तालिबानने सुरूवातीला म्हटले होते. तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिदने मंगळवारी पत्रकार परिषद घेत तालिबानकडून महिलांच्या अधिकारांचा इस्लामच्या कायद्यानुसार सन्मान केला जाईल असे म्हटले होते. मात्र, तालिबान आपले शब्द पाळत नसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा -ETV Explainer : तालिबान लागू करत असलेल्या शरिया कायद्यात महिलांसाठी काय नियम आहेत?

Last Updated : Aug 23, 2021, 2:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details