लष्करातील दोन जवानांनी आपल्या साथीदारांवरच केला गोळीबार; 9 जवानांचा मृत्यू - afghanistan army news
अफगानिस्तानच्या कंधार प्रांतामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी आपल्याच साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात ९ जवानांच्या मृत्यू झाला आहे. दोन जवानांनी हे कृत्य केले असून या प्रकारामुळे लष्करी तुकडीत खळबळ उडाली आहे.
काबूल - अफगानिस्तानच्या कंधार प्रांतामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी आपल्याच साथीदारांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात ९ जवानांच्या मृत्यू झाला आहे. दोन जवानांनी हे कृत्य केले असून या प्रकारामुळे लष्करी तुकडीत खळबळ उडाली आहे.
अफगानिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री ही घटना घडली. शाह वाली कोट जिल्ह्यातील दमानी भागात हा प्रकार समोर आला आहे. गोळीबार केल्यानंतर ते दोन जवान घटनास्थळावरून पळून गेले. या पूर्वीही शाह वाली कोट जिल्ह्यात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी एका जवानाने ७ पोलिसांवर गोळ्या झाडल्या होत्या, त्यात सातही पोलिसांचा मृत्यू झाला होता.