महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हेल्मंड : रस्त्याकडेला झालेल्या बॉम्बस्फोटात अफगाण सुरक्षा अधिकाऱ्याचा मृत्यू - अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट न्यूज

दक्षिण अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात शनिवारी रस्त्याकडेला झालेल्या बॉम्ब स्फोटात राष्ट्रीय सुरक्षेचा स्थानिक संचालक ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. या स्फोटात हेल्मंडच्या नावा जिल्ह्याच्या राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाचे प्रमुख आणि एक सैनिक ठार झाला.

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट न्यूज
अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट न्यूज

By

Published : Dec 27, 2020, 12:25 PM IST

हेल्मंड (अफगाणिस्तान) - दक्षिण अफगाणिस्तानच्या हेल्मंड प्रांतात शनिवारी रस्त्याकडेला झालेल्या बॉम्ब स्फोटात राष्ट्रीय सुरक्षेचा स्थानिक संचालक ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. हेल्मंडच्या नावा जिल्ह्यात शनिवारी सकाळी 7 च्या सुमारास (15:00 GMT) हा स्फोट झाला.

या स्फोटात हेल्मंडच्या नावा जिल्ह्याच्या राष्ट्रीय सुरक्षा संचलनालयाचे प्रमुख आणि एक सैनिक ठार झाला.

हेही वाचा -मध्य आफ्रिकी प्रजासत्ताकमधील सशस्त्र हल्ल्यात 3 संयुक्त राष्ट्र शांततासैनिक ठार, 2 जखमी

अफगाणच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, देशाच्या हेल्मंड व कंदहार प्रांतांमध्ये अफगाण वायुसेनेच्या (एएएफ) हल्ल्यात तब्बल 66 दहशतवादी ठार झाले आणि 18 इतर जखमी झाले.

सैन्याच्या म्हणण्यानुसार, एएएफच्या हल्ल्यात चार अल-कायदा (दहशतवादी गट, रशियामध्ये बंदी घातलेला) आणि 26 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि गेल्या दोन दिवसांत हेल्मंड च्या नावा जिल्ह्यात सहा जण जखमी झाले. शुक्रवारी प्रांताच्या नाद-ए-अली जिल्ह्यात अफगाण सुरक्षा दलावर हल्ल्याचा कट रचणाऱ्या आणखी सात दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.

हेही वाचा -सीरियात मध्यरात्री झालेल्या इस्रायली हल्ल्यात 6 सैनिक ठार

ABOUT THE AUTHOR

...view details