महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

देश सोडून पसार झाल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले अशरफ घनी, पैसा चोरल्याचे आरोप फेटाळले

तालिबानने राजधानी काबूलमध्ये कब्जा मिळवल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला होता. यानंत ते पहिल्यांदाच समोर आले आहेत. व्हिडिओ जारी करून त्यांनी देश सोडण्यामागचे कारण सांगितले. तसेच देशाचा पैसा चोरल्याचे आरोप फेटाळले. तसेच पुन्हा मायदेशी परतण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे घनी यांनी सांगितले.

Afghan President Ashraf Ghani
अशरफ घनी

By

Published : Aug 19, 2021, 9:56 AM IST

नवी दिल्ली - तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला असून देशात अराजकता पसरली आहे. काबूल शहरात तालिबानी घुसल्यानंतर देश सोडून पळून गेलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये आश्रय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अशरफ घनी यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करत अफगाणिस्तानमध्ये सोडून जाण्याच्या निर्णयामागील कारण सांगितले. राजधानी काबूल तालिबानने काबीज केल्यानंतर रक्तपात टाळण्यासाठी आपण देश सोडला असं त्यांनी स्पष्ट केले. तसेच आपण कोणत्याही पैशाच्या बॅगा घेऊन देश सोडला नाही. याचबरोबर मायदेशी परतणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिरिया आणि येमनमध्ये झालेल्या रक्तपातासारखी स्थिती अफगाणिस्तानात निर्माण होऊ नये, म्हणून मी काबूल सोडण्याचा निर्णय घेतला. जर मी देशाचा राष्ट्रपती म्हणून राहिलो असतो, तर लोकांना तालिबान्यांनी फासावर लटकवलं असतं. मला मृत्यूची भीती वाटत नाही आणि अफगाणिस्तानचा अपमान करणे मला मान्य नाही. रक्तपात आणि अफगाणिस्तानचा नाश टाळण्यासाठी मला अफगाणिस्तानातून बाहेर निघावे लागले, असे घनी म्हणाले.

आपल्या फेसबूक संदेशात अफगाण सुरक्षा दलांचे घनी यांनी आभार मानले. मात्र, शांतता स्थापीत करण्यात अपयश आल्याने तालिबानने सत्ता हिसकावल्याचे त्यांनी म्हटलं. तसेच सध्या देशामध्ये सरकारने सुरु केलेल्या वाटाघाटीच्या चर्चांना माझा पाठिंबा आहे. आता अब्दुल्ला आणि माझी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्यामध्ये चर्चा सुरु आहे. ही चर्चा यशस्वी होणं गरजेचं आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मानवतावादी आधारावर अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबाचे देशात स्वागत करण्यात आल्याचे यूएईचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

पैसे घेऊन पळालो नाही -

काबूल सोडताना अशरफ घनी राज्य निधीतून 169 दशलक्ष डॉलर्स रुपये घेऊन गेले होते, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हे आरोप त्यांनी फेटाळले. देश सोडताना आपण फक्त एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट आणि घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेतल्या होत्या. पैशासंदर्भातील आरोप निराधार आहेत, असे त्यांनी सांगितले. काबूलमधील रशियन दुतवासाने दावा केला होता, की अशरफ घनी हे चार गाड्या आणि एका हेलिकॉप्टरमध्ये पैसे भरून पसार झाले. त्यांनी सर्व पैसे हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, एवढा पैसा त्यात मावला नाही. त्यामुळे काही पैसे त्यांनी धावपट्टीवर सोडले.

नागरिकांची अत्यंत भयावह स्थिती -

गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण तयार झालंय. तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहेजो तो देश सोडण्यासाठी प्रयत्न करतोय. काबूल विमानतळावरील नागरिकांची अत्यंत भयावह स्थिती आहे. विमानतळावरील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा -काबूलमधून उड्डाण भरलेल्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये आणि चाकांमध्ये आढळले मृतदेह

हेही वाचा -'...तर गंभीर परिणाम भोगावे लागतील'; अफगाण तालिबानचा भारताला इशारा

हेही वाचा -Afghanistan Crisis : अफगाणिस्तानवर तालिबानाचा ताबा; जाणून घ्या जगातील प्रमुख नेते काय म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details