महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू अन्वरचा विमानातून कोसळून मृत्यू - अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू अन्वर

अफगाणिस्तान सोडण्यासाठी अमेरिकी सैन्याच्या विमानाच्या चाकावर असलेल्या जागेत बसलेल्या तिघांचा पडून मृत्यू झाला होता. या तिघांपैकी एकाची ओळख पटली आहे. या तिघांपैकी एकजण अफगाणिस्तानच्या नॅशनल फुटबॉल टीमचा खेळाडू जाकी अन्वर होता. ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Afghan footballer died after falling from US plane leaving Kabul
अफगाणिस्तानचा नॅशनल फुटबॉलपटू अन्वर

By

Published : Aug 20, 2021, 7:44 AM IST

दोहा(कतार) -अफगानिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघातील फुटबॉलर जाकी अन्वरचे गुरवारी निधन झाले. काबूल विमानतळावरून उड्डाण भरलेल्या अमेरिकीच्या बोईंग सी-17 विमानाच्या चाकावर तो बसला होता. विमानाने उड्डान भरल्यानंतर तो खाली कोसळला आणि मृत्य झाला. जाकीच्या मृत्यूची घोषणा अफगाण राष्ट्रीय फुटबॉल संघाने फेसबूकच्या माध्यमातून केली.

16 ऑगस्टला हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एक व्हिडिओ समोर आला होता. अमेरिका हवाई दलाचे विमान उड्डाण भरण्यासाठी धावपट्टी धावत होते. तेव्हा अफगाण लोक विमानासोबत धावत असल्याचे व्हिडिओत दिसत होते. विमानाने उड्डाण भरण्यापूर्वी काही लोक विमानाच्या चाकावर असलेल्या जागेत बसल्याचे दिसत होते. जेव्हा विमानाने उड्डान घेतले. तेव्हा संतुलन गमावल्यानंतर ते लोक खाली कोसळले. तीन लोकांचा कोसळून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शहरातील घरांच्या छतावर मिळाले होते. तर लँडिंग केल्यानंतर विमानाच्या चाकांमध्ये अमेरिकेन सैन्यांना मानवी शरिराचे अवशेष आढळले होते.

गेल्या दोन दशकांपासून अफगाणिस्तानात सुरू असलेल्या गृहयुद्धातून अमेरिका आणि नाटो सैन्याने माघार घेताच तालिबानने अफगाणवर ताबा मिळवला. तालिबानच्या ताब्यात जाताच, अफगाणिस्तानमध्ये अराजकता पसरली आहे. तालिबानने संपूर्ण देशात धुडगूस घातला असून नागरिकांचे हाल सुरू आहेत. तालिबानच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने देश सोडण्यासाठी नागरिक धडपडत आहेत.

दिशाहीन तालिबान सैरभैर -

पूर्णपणे सत्ता मिळविलेला तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे. देश चालविण्यासाठी कुठलेच धोरण किंवा योजना समोर नसल्याने माजी सरकारी अधिकाऱ्यांसमोर आर्जव करण्याची वेळ तालिबानवर ओढवल्याचे दिसत आहे. मात्र तालिबानच्या भितीने अनेक सरकारी अधिकारी भूमिगत झाले असून ते आता देशातून पलायनाच्या तयारीत असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे. देशाचे नेतृत्व कशा पद्धतीने केले जाईल याविषयी तालिबानने अजून काहीही स्पष्ट केलेले नाही.

हेही वाचा -Viral Video : अफगाणिस्तानातून निघण्यासाठी नागरिकांची काबूल विमानतळावर पुन्हा गर्दी

हेही वाचा -मौज कर दी! तालिबान्यांनी अलिशान कार्यालयात ठोकलं तळ

ABOUT THE AUTHOR

...view details