महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तानच्या आर्थिक स्थिरतेसाठी एडीबीने केले 30 कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर

कर्जाचे उद्दीष्ट शाश्वत पद्धतीने पाकिस्तानमधील तूट परिस्थितीचे निराकरण करणे आणि निर्यातीचे विविधीकरण सुलभ करणे हे आहे, असे एडीबीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हे व्यापार आणि स्पर्धा कार्यक्रमाच्या सब-प्रोग्राम -२ अंतर्गत हे नवीन वित्तपुरवठाधोरण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँके न्यूज
एशियन डेव्हलपमेंट बँके न्यूज

By

Published : Dec 1, 2020, 7:49 PM IST

इस्लामाबाद - एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) व्यापार व्यवस्थेत सुधारणा करून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी 30 कोटी डॉलर्सच्या धोरण-आधारित कर्जाला मान्यता दिली आहे. एडीबीतर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली.

एडीबीने दिलेल्या निवेदनाचा हवाला देताना वृत्तसंस्था सिन्हुआने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कर्जाचे उद्दीष्ट शाश्वत पद्धतीने पाकिस्तानमधील तूट परिस्थितीचे निराकरण करणे आणि निर्यातीचे विविधीकरण सुलभ करणे हे आहे.

हेही वाचा -पाकिस्तान : वाहनावर झालेल्या गोळीबारात 4 ठार

एडीबीने पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी आणि प्रमुख संस्थांना आणखी बळकट करण्यासाठी त्यांच्याकडून दर आणि कर-संबंधी धोरणात सुधारणा आणली जाईल. हे व्यापार आणि स्पर्धा कार्यक्रमाच्या सब-प्रोग्राम -२ अंतर्गत हे नवीन वित्तपुरवठाधोरण आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्याअंतर्गत एडीबीने सरकारला काही मोठ्या सुधारणांमध्ये मदत केली असून यामध्ये कच्चा माल आणि मध्यवर्ती वस्तूंवरील मोठ्या प्रमाणावर शुल्क आणि तत्सम करवसुली रद्द करणे समाविष्ट आहे.

हेही वाचा -लंडन : लॉकडाऊनविरोधात आंदोलन करणाऱ्या 150 हून अधिक लोकांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details