महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पाकिस्तान- त्या नराधमाचे "एनकाऊंटर", कबरीतून मृतदेह काढून 14 वर्षीय मुलीवर केला होता बलात्कार

सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी पोलिसांना आदेश दिले होते की, महिला, मुले आणि अल्पसंख्यांकांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कोणतीही दया दाखवू नका.

accusd arrested in encounter who physical abused on deadbody were in grave thatta pakistan
पाकिस्तानमधील त्या नराधमाचे एनकाऊंटर

By

Published : Aug 23, 2021, 2:55 PM IST

Updated : Aug 23, 2021, 4:46 PM IST

ठट्टा (पाकिस्तान) -14 वर्षीय मुलीचा मृतदेह कबरेतून काढून त्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचे एनकाऊंटर केले. रफिक चांडियो असे आरोपीचे नाव आहे. मृत मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

एफआयआरमध्ये रमजान चंदियोने रफीकवर गुन्हा केल्याचा आरोप केला होता. तसेच त्याने असे म्हटले की, आरोपीला मुलींची छेडछानी करण्याची पार्श्वभूमी आहे. तसेच तो दारूही विकतो. यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात संशयिताला शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची अंगठी घटनास्थळी सापडली होती. अटकेच्या एक दिवसानंतर रविवारी पहाटे दीडच्या सुमारास घारो पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चकमकीत चंदियो ठार झाला.

दरम्यान, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी पोलिसांना आदेश दिले होते की, महिला, मुले आणि अल्पसंख्यांकांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कोणतीही दया दाखवू नका. तसेच मुख्यमंत्र्यांनी सिंध पोलिसांना प्रांतातील ड्रग्ज माफियांच्या विरोधात कारवाई वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -अफगाणिस्तानात सत्तेवर येण्यासाठी तालिबानला पाकिस्तानची मदत, अमेरिकन खासदाराचा गंभीर आरोप

काय आहे घटना ?

काही अज्ञातांनी नुकतेच पुरलेल्या किशोरवयीन मुलीचे प्रेत खोदून तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी (14 ऑगस्ट) मौलवी अशरफ चांडियो गावात गुलामउल्लाजवळ घडली. पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या वृत्तसंस्थेने याबाबतचे दिले. दरम्यान, हे वेडसर व्यक्तीचे कृत्य असल्याचे सांगण्यात आले.

आई -वडील आणि नातेवाईकांनी माध्यमांना सांगितले की, त्यांचा विश्वास आहे की स्थानिक गुंड जो गावातील जमीनदाराचा मुलगा होता तो गुन्ह्यात सहभागी होता. ते म्हणाले, नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झालेल्या 14 वर्षीय मुलीला त्यांनी रात्री उशिरा गावातील स्मशानभूमीत पुरले आणि यानंतर ते परतले. मात्र, यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक परंपरेनुसार जेव्हा पालकांनी कबरस्तानात भेट दिली. यावेळी त्यांना मृतदेह खोदून बाहेर काढल्याचे जाणवले. नंतर तो मृतदेह जंगलात सापडला. यावेळी मृतदेहावर बलात्कार केल्याची चिन्हे यावेळी जाणवली.

Last Updated : Aug 23, 2021, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details