महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना विषाणू :  आई-मुलीचा भावूक क्षण, हवेत मारली मिठी

विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांनाही बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरोना विषाणू
कोरोना विषाणू

By

Published : Feb 9, 2020, 7:17 PM IST

बिजींग -चीनमधील कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे बळींचा आकडा दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. विषाणूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिकांनाही बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी त्यांना आपल्या कुटूंबापासून दूर रहावे लागत आहे. चीनमधील अशाच एका परिचारिकेचा एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे.

संबधीत व्हिडिओमध्ये परिचारिका आणि तिची 9 वर्षाची मुलगी रडत असून मुलगी आपल्या आईला आठवण येत असल्याचे सांगते. विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून आई आणि मुलगी एकमेकांपासून दूर उभ्या राहुन हवेत मिठी मारतात. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून आतापर्यंत 13 लाख लोकांनी पाहिला आहे. चीनमधील हेनान प्रांतातील हा व्हिडिओ आहे. चीनमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विषाणूंचा संसर्ग झालेल्यांवर चीनमधील डॉक्टर उपचार करत आहेत. चीनच्या वुहान प्रांतात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे डिसेंबरमध्ये सर्वात प्रथम निदर्शनास आले होते. तेव्हापासून आतापर्यंत हा आजार तब्बल २५ देशांमध्ये पसरला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details