जकार्ता - इंडोनेशियातील मकालू प्रांतात आज(गुरुवार) 6.8 रिश्टर स्केलचा भुकंप झाला. भुकंपाचे कंद्र समुद्राच्या आतमध्ये होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास भुकंपाचे धक्के बसले. मात्र, सुनामीचा धोका नसल्याचे हवामान आणि भुगर्भशास्त्र विभागाने सांगितले.
इंडोनेशियाला 6.8 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, सुनामीचा धोका नाही - Pulau Marotai district
सुरवातीला 7.1 क्षमतेचा भुकंप झाल्याची माहिती हवमान विभागाने दिली. मात्र, नंतर आढावा घेऊन 6.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंप झाल्याचे सांगण्यात आले.
इंडोनेशिया भुकंप
सुरवातीला 7.1 क्षमतेचा भुकंप झाल्याची माहिती हवमान विभागाने दिली. मात्र, नंतर आढावा घेऊन 6.8 रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंप झाल्याचे सांगण्यात आले. पुलाऊ मारोताई जिल्ह्यापासून ईशान्येकडे 89 कि.मी दुर असलेल्या दारुबा गावाजवळ भुकंपाचे केंद्र होते. या भुकंपात जिवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही.
इंडोनेशिया 'पॅसिफिक रिंग ऑफ फायर' या भौगोलिक क्षेत्रात येत असल्याने तेथे वारंवार भुकंप होतात.
Last Updated : Jun 4, 2020, 4:52 PM IST