जाकार्ता - इंडोनेशियाच्या पश्चिमेस सुमात्रा प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली. मात्र, त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. देशाच्या हवामान व भू-भौतिकशास्त्र संस्थेने मंगळवारी ही माहिती दिली.
हेही वाचा -हाँगकाँगमधील इमारतीत लागलेल्या आगीत 7 ठार
सिन्हुआच्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सुमात्रा प्रांतापासून 109 किलोमीटर अंतरावर असून नैऋत्य भागात जमिनीच्या 10 किलोमीटर खाली होता. मंगळवारी रात्री 8.44 वाजता या भूकंपाचे धक्के जाणवले.
कोणातेही वित्त, मालमत्तेचे नुकसान झाल्याचे किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
हेही वाचा -पाकिस्तान : प्रवासी वाहन खड्ड्यात कोसळून 8 जण ठार, 11 जखमी