जकार्ता - इंडोनेशियातील सुंबा प्रांताला आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ६.० एवढी मोजण्यात आली. सकाळी ५.२९ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. अद्याप कसल्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
इंडोनेशियाला भूकंपाचे धक्के, तीव्रता ६.० रिश्टर स्केल - magnitude
सकाळी ५.२९ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले. अद्याप कसल्याही प्रकारची जीवित किंवा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही.
अमेरिकन भूवैज्ञानिकांच्या सर्वेक्षणानुसार भूकंपाचे केंद्र वांगपू शहरापासून साधारणपणे १५० किलोमीटरवरील सुम्बा बेटाजवळ ३१ किलोमीटर खोल होते. इंडोनेशियातील आपत्तीनिवारण संस्थेच्या माहितीनुसार या भूकंपानंतर याच भागात आणखी एक ५.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला.
यापूर्वी गेल्या महिन्यातच इंडोनेशियाला सुनामीचा तडाखा बसला होता. यात ४२५ वर नागरिकांचा मृत्यू झाला. तर १ हजार ४८५ वर लोक जखमी झाले होते. याशिवाय मोठ्या प्रमाणावर वित्त हानीही झाली होती. सुंदा सामुद्रधुनीच्या किनाऱ्यावर रात्रीच्या सुमारास त्सुनामीचा तडाखा बसला होता.