महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीन मुख्य भूमीवर कोरोनाचे 53 नवे रुग्ण - चीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण न्यूज

शुक्रवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे 53 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 37 स्थानिक तर, परदेशातून 16 आलेले लोक आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी आपली माहिती दिली.

चीन लेटेस्ट कोरोना न्यूज
चीन लेटेस्ट कोरोना न्यूज

By

Published : Jan 8, 2021, 7:47 PM IST

बीजिंग -शुक्रवारी चीनमध्ये कोरोना विषाणूचे 53 नवे रुग्ण आढळले आहेत. यातील 37 स्थानिक तर, परदेशातून 16 आलेले लोक आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी आपली माहिती दिली.

या आयोगाचा हवाला देताना वृत्तसंस्था सिन्हुआने सांगितले की, स्थानिक 37 प्रकरणांपैकी 33 जण हेबेईमध्ये, दोन लाओनिंग आणि बीजिंग आणि हेलॉन्जियांगमध्ये प्रत्येकी आढळले आहेत.

हेही वाचा -इस्रायलमध्ये पुन्हा लागू होणार लॉकडाऊन

परदेशातून आलेल्यांपैकी शांघायमधील आठ, ग्वांगडॉंगमध्ये तीन आणि लियाओनिंग, जिआंग्सु, फुझियान, हेनान आणि हुनान येथे प्रत्येकी एक नव्या रुग्णाची नोंद झाली. गुरुवारी या विषाणूमुळे कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.

नवीन प्रकरणांसह, चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही संख्या 87 हजार 331 वर पोहोचली आहे. तर, मृतांची संख्या 4 हजार 634 वर पोचली आहे.

हेही वाचा -लेबेनॉनमध्ये 25 दिवस पूर्ण लॉकडाउन

ABOUT THE AUTHOR

...view details