ढाका -बांगलादेशच्या बुरीगंगा नदीत बोट बुडाल्याने 30 जणांचा मृत्यू झाला. बोट दुसर्या जहाजाशी धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये 19 पुरुष तर 8 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.
बांगलादेशात नदीत बोट बुडाली.. 30 जणांना जलसमाधी - बुरीगंगा नदी
बांगलादेशच्या बुरीगंगा नदीत बोट बुडाल्याने 30 जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये 19 पुरुष तर 8 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे.
बांगलादेश इनलँड वॉटर ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (बीआयडब्ल्यूटीए) च्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ढाका येथील श्यामबाजारजवळ सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला. वाहनचालकांच्या दुर्लक्षामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बोटीत सुमारे 100 लोक होते.
सध्या मृतांची ओळख पटली आहे. 'मॉर्निंग बर्ड' नावाची ही बोट ढाका येथून मुंशीगंजकडे जात होती. तेव्हा बोटीची धडक 'मोयूर-2' नावाच्या जहाजाशी झाली. 'मोयूर-2' जहाजात बसलेले 1 हजार प्रवासी सुरक्षित आहेत, असे पोलिसांनी सांगितले.