महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

चीनमध्ये खाणीतील अपघातात 23 कामगार ठार, एकाला वाचवण्यात यश

कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढल्यानंतर सर्व मजूर खाणीतच अडकले. त्या वेळी खड्ड्यात 24 मजूर होते. त्यांना वाचवण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू झाले. मात्र, या अपघातात 23 कामगारांना जीव गमवावा लागला. तर, एकाला वाचवण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी ही खाण बंद झाली होती. चोंगकिंग नगरपालिकेच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.

चीनमध्ये कोळसा खाणीत अपघात न्यूज
चीनमध्ये कोळसा खाणीत अपघात न्यूज

By

Published : Dec 6, 2020, 12:48 PM IST

बीजिंग -चीनमधील एका खाणीत कार्बन मोनोऑक्साइडची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचल्यानंतर 23 खाण कामगारांचा मृत्यू झाला. तर, एकाला वाचविण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. चोंगकिंग नगरपालिकेच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.

हेही वाचा -थायलंडमध्ये वादळासह मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, 13 जण ठार

सिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार, हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास योंगचुआन जिल्ह्यातील डायओसुईदोंग येथील बंद असलेल्या कोळसा खाणीत घडला. दोन महिन्यांपूर्वी ही खाण बंद झाली होती. घटनेवेळी कामगार खड्ड्यात उपकरणे उघडत होते. त्या वेळी खड्ड्यात 24 मजूर होते.

कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढल्यानंतर सर्व मजूर खाणीतच अडकले. त्यांना वाचवण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू झाले. मात्र, या अपघातात 23 कामगारांना जीव गमवावा लागला. तर, एकाला वाचवण्यात आले आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास केला जात आहे.

हेही वाचा -13 चिनी नागरिक कोळशाच्या खाणीत अडकले, बचावकार्य सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details