इस्लामाबाद : शीख यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसला रेल्वेने धडक दिल्यामुळे १९ जण जागीच ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडली.
पाकिस्तानात रेल्वे-बसमध्ये भीषण अपघात; १९ शीख यात्रेकरू जागीच ठार! - पाकिस्तान शीख यात्रेकरू बस अपघात
शीख यात्रेकरुंना घेऊन जाणाऱ्या बसला रेल्वेने धडक दिल्यामुळे १९ जण जागीच ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या शेखपुरा जिल्ह्यामध्ये ही दुर्घटना घडली.
![पाकिस्तानात रेल्वे-बसमध्ये भीषण अपघात; १९ शीख यात्रेकरू जागीच ठार! 19 killed as train hits Sikh pilgrims bus in Pakistan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7876782-855-7876782-1593773616913.jpg)
रेल्वे-बसमध्ये भीषण अपघात; १९ शीख यात्रेकरू जागीच ठार!
इव्हॅक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे (इटीबीपी) प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी याबाबत माहिती दिली. या अपघातात बळी गेलेल्यांपैकी बहुतांश शीख हे पाकिस्तानचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये रेल्वे-बसमध्ये भीषण अपघात; १९ शीख यात्रेकरू जागीच ठार!
कराची ते लाहोर जाणाऱ्या शाह हुसैन एक्स्प्रेसने दुपारी दीडच्या सुमारास या मिनी बसला धडक दिली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Last Updated : Jul 3, 2020, 8:19 PM IST