बीजिंग (चीन)- चीनमध्ये १४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील १२ रुग्ण हे कोरोनाची लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. त्यामुळे, आता चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ही एकूण ८२, हजार ८७७ इतकी झाली असून ४ हजार ६३० रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आज आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
१४ रुग्णांमधील २ रुग्ण हे शनिवारी पाझिटिव्ह आढळले होते. त्याचबरोबर, काल कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्याने मृतकांचा आकडा हा ४ हजार ६३३ इतकाच राहिल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाकडून सांगण्यात आले आहे. चीनमध्ये देशाबाहेरून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ हजार ६७२ इतकी आहे. त्यापैकी, ४५१ हे चीनी नागरिक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यापैकी ६ जणांची प्रकृती नाजूक आहे. चीनमध्ये आतापर्यंत लक्षण नसलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ही ९६८ इतकी आहे. यातील ९८ कोरोनाबाधित रुग्ण हे विदेशातून आलेले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाचे लक्ष आहे.