महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

13 चिनी नागरिक कोळशाच्या खाणीत अडकले, बचावकार्य सुरू

चीनच्या हुनान प्रांतातील कोळशाच्या खाणीत पुराचे पाणी शिरले आहे. या खाणीत तब्बल 13 लोक अडकले. मंगळवारी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. लिआंग शहरातील युआन जियांगशान कोळसा खाणीत रविवारी सकाळी हा अपघात झाला.

चीन कोळसा खाण दुर्घटना न्यूज
चीन कोळसा खाण दुर्घटना न्यूज

By

Published : Dec 1, 2020, 7:58 PM IST

बीजिंग - चीनच्या हुनान प्रांतातील कोळशाच्या खाणीत पुराचे पाणी शिरले आहे. या खाणीत तब्बल 13 लोक अडकले. मंगळवारी अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा -अफगाणिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोटात 30 ठार, 24 जखमी

सिन्हुआच्या वृत्तानुसार, लिआंग शहरातील युआन जियांगशान कोळसा खाणीत रविवारी सकाळी हा अपघात झाला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बचाव कार्यात 11 पथकांचे 860 सदस्य सामील आहेत.

बचाव मुख्यालयाच्या म्हणण्यानुसार, कोळशाच्या खाणीतून पंपिंग सिस्टमद्वारे पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे.

हेही वाचा -वुहानमधील तपास अधिकाऱ्यांना गोठवलेल्या अन्नावर आढळला कोविड-19चा विषाणू

ABOUT THE AUTHOR

...view details