अलेप्पो - सिरियातील अलेप्पो शहराजवळच्या एका गावात दहशदतवाद्यांनी हल्ला केला. उखळी तोफांनी केलेल्या या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अल वाहीदी नावाच्या या गावात दहशतवादी हल्ल्यात अनेक घरेही उद्ध्वस्त झाली.
सिरियात दहशतवादी हल्ल्यात १२ जण ठार, हवाई दलाच्या प्रत्युत्तरात ७ दहशतवादी ठार - terror group attack
२०११ पासून सिरियात गृहकलह सुरू आहेत. मार्च २०११ मध्ये सुरू झालेल्या या सिरियन संघर्षात आतापर्यंत ३ लाख ७० हजार लोक मारले गेले आहेत.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार अलेप्पो शहराबाहेरून दहशवाद्यांनी उखळी तोफांद्वारे तोफगोळ्यांचा मारा केला. यातील काही तोफगोळे हे अल वाहीदी गावात पडले. त्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून सिरियन हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
२०११ पासून सिरियात गृहकलह सुरू आहेत. मार्च २०११ मध्ये सुरू झालेल्या या सिरियन संघर्षात आतापर्यंत ३ लाख ७० हजार लोक मारले गेले आहेत. तर लाखो लोकांनी सिरिया सोडून इतर देशांत स्थलांतर केले आहे.