महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बलुचिस्तानात 11 कोळसा खाणकामगारांचे अपहरण, गोळ्या घालून केले ठार - पाकिस्तान खाणकामगार हत्या न्यूज

प्रांताच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र व्यक्तींनी कामगारांचे हात-पाय बांधले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. अन्य तीन कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.

बलुचिस्तान लेटेस्ट न्यूज
बलुचिस्तान लेटेस्ट न्यूज

By

Published : Jan 3, 2021, 5:30 PM IST

इस्लामाबाद -पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अज्ञात बंदूकधारकांनी कोळशाच्या खाणीतील 11 कामगारांना गोळ्या घालून ठार केले. रविवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

वृत्तसंस्था सिन्हुआने उपायुक्त मुराद कासी यांच्या हवाल्याने सांगितले की, अज्ञात बंदूकधार्‍यांनी शनिवारी रात्री उशिरा बोलन जिल्ह्यातील कामगारांचे अपहरण करण्यात आले आणि त्यांना पकडून दुसर्‍या भागात नेल्यानंतर त्यांची हत्या केली.

हेही वाचा -पाकिस्तानमध्ये झालेल्या आयईडी स्फोटात 2 ठार, 8 जखमी

प्रांताच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र व्यक्तींनी कामगारांचे हात-पाय बांधले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. अन्य तीन कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.

घटनेचा तपास सुरू आहे. अद्याप कोणत्याही गटाने किंवा व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच, अशा लोकांवर कारवाई निश्चिपणे केली जाईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा -नवीन वर्षाच्या उत्सवाच्या वेळी होंडुरासमध्ये 18 ठार

ABOUT THE AUTHOR

...view details