महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 27, 2019, 11:47 PM IST

ETV Bharat / international

...तर बंद होऊ शकते तुमचे ट्विटर अकाऊंट

मोठ्या काळासाठी लॉग इन न करणारे आणि निष्क्रिय राहणारे युजर्स कोण आहेत, याची माहिती घेऊन त्यांची अकाऊंटस डिलीट केली जाणार आहेत. यामुळे आता सहा महिन्यांत एकदा तरी अकाऊंटला लॉग इन करून ट्विट करावेच लागणार आहे.

ट्विटर
ट्विटर

कॅलिफोर्निया -ट्विटरने त्यांच्या अकाऊंट पॉलिसीमध्ये नवी सुधारणा आणली आहे. बऱ्याच काळासाठी लॉग इन न करण्यात आलेली आणि ट्विट न केलेली अकाऊंटस काढून टाकण्याची घोषणा ट्विटरने केली आहे.

आपल्या युजर्सनी किमान ६ महिन्यांतून एकदा आपल्या अकाऊंटवर जावे आणि ट्विट करावे, यासाठी ट्विटरने हा उपाय केला आहे. ११ डिसेंबर २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.

मोठ्या काळासाठी लॉग इन न करणारे आणि निष्क्रिय राहणारे युजर्स कोण आहेत, याची माहिती घेऊन त्यांची अकाऊंटस डिलीट केली जाणार आहेत. यामुळे आता सहा महिन्यांत एकदा तरी अकाऊंटला लॉग इन करून ट्विट करावेच लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details