महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जगभरात कोरोनाचे रुग्ण 15 लाखांच्या पुढे; 91 हजार दगावले - कोरोना जागतिक आकडेवारी

अमेरिकेत आज दिवसभरात 1 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकून 15 हजारांपेक्षा जास्त नागरिक दगावले आहे.

file pic
कोरोना संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 9, 2020, 10:37 PM IST

रोम - जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. आत्तापर्यंत 15 लाख 54 हजार नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे, तर 91 हजार 828 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 3 लाख 45 हजार रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत.

अमेरिकेत आज दिवसभरात 1 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकून 15 हजारांपेक्षा जास्त नागरिक दगावले आहे. अमेरिकेत सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार झाला असून एकून रुग्णांची 4 लाख 40 हजारांपर्यत पोहचली आहे. युरोप खंडातील रुग्णांची संख्याही 6 लाखांच्या पुढे गेली आहे. चीनमधील परिस्थिती सुधारत असताना युरोप आणि अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

विविध देशांची परिस्थिती

स्पेन - 1 लाख 52 हजार रुग्ण, तर 15 हजार 238 मृत्यू

इटली - 1 लाख 43 हजार रुग्ण, तर 18 हजार 279 मृत्यू

जर्मनी - 1 लाख 14 हजार रुग्ण, तर 2 हजार 300 मृत्यू

फ्रान्स - 1 लाख 12 हजार रुग्ण, तर 10 हजार मृत्यू

इंग्लड - 60 हजार रुग्ण, तर 7 हजार मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details