माउंट लिआमुईगा -सावित्रीने पती सत्यवानाचे प्राण यमराजाच्या हातून परत आणल्याची आख्यायिका आहे. अशाच एका अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून परत आणल्याची घटना घडली आहे. ज्वालामुखीत पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला जीव धोक्यात घालून ५० फूट खोल खड्ड्यात उतरली. या सावित्रीने ज्वालामुखीतून पतीला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.
अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून आणले परत
एका अमेरिकन सावित्रीने पतीचे प्राण ज्वालामुखीतून परत आणल्याची घटना घडली आहे. ज्वालामुखीत पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी ही महिला जीव धोक्यात घालून ५० फूट खोल खड्ड्यात उतरली. या सावित्रीने ज्वालामुखीतून पतीला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.
क्ले चास्टौन आणि त्याची पत्नी अकायमी हे जोडपे मधुचंद्रासाठी कॅरेबियन बेटांवर गेले होते. येथील सेंट किट्सवर माउंट लिआमुईगा या ठिकाणी ते साहसी गिर्यारोहणासाठी गेले. कोणाचीही मदत न घेता, वाटाड्या सोबत न घेता ३ हजार ७०० फूटावरील शिखर गाठण्याचे ठरवले. शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांना एक मृत ज्वालामुखी दिसला. उत्सुकतेपोटी दोघेही हार्नेस आणि क्लिप्सच्या सहाय्याने दोर लावून ज्वालामुखीमध्ये डोकावले. मात्र, दुर्दैवाने क्ले चास्टैनने सुरक्षेसाठी वापरलेली दोरी तुटली आणि तो ५० फूट खोल ज्वालामुखीत पडला.