जीनिव्हा - कोरोनाचा महिला, लहान मुले आणि किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस् यांनी जीनिव्हामधून ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचा लहान मुले, महिला आणि किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम हा कोरोनच्या मृत्यूमुळे अधिक असेल, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. कोरोनाचा आरोग्य व्यवस्थेवर अनेक ठिकाणी परिणाम झाला आहे. विशेषत: प्रसूतीतील गुंतागुंतीमुळे महिलांच्या मृत्यूची जोखीम वाढली आहे, असे टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले.
ते म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याच्या सुविधा आणि समुदायात अत्यावशक सेवांसाठी मार्गदर्शन सूचना दिल्या आहेत. या सूचना महिला, नवजात बालक आणि किशोरवयीन मुलांसाठी आहेत. मातेला जरी कोणाची लागण झाली तरी तिने मुलाला स्तनपान करावे, यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे. मातेला खूपच बरे वाटत नसेल तोपर्यंत नवजात बालकाला आईपासून विलग करू नये.
विशीतील मुलांवर नैराश्य, चिंता, ऑनलाइन छळणूक, मानसिक आणि लैंगिक हिंसाचार असे परिणाम महामारीच्या काळात दिसून येत आहेत. कोरोनाचा तरुणांवर नाट्यमय परिणाम होणार आहे. कारण शाळा महाविद्यालय यांना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी मर्यादित पर्याय जागतिक आरोग्य संघटनेच्या संचालकांनी म्हटले आहे.