जिनिवा: जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organisation) प्रमुख टेड्रोस अदहानोम गेब्रेयेसस (WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी इशारा दिला आहे की, कोरोना वायरस आणि त्याच्या स्वरुपांना येण्यासाठी आदर्श स्थिती निर्माण झाली आहे. तसेच पुढे सांगितले की, ओमायक्रॉन शेवटचे स्वरुप आहे किंवा आपण महामारीच्या शेवटच्या टप्पयात आहोत, धोकादायक विचारआहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख हे सुद्दा म्हणाले की, जर आपण मुख्य लक्ष्य साध्य केले, तर महामारीचा घातक काळ यंदा सपवू शकतो. जागतिक संस्थेचे महासंचालकांनी सोमवारी उपलब्धींवर प्रकाश टाकला आणि तंबाखूचा वापर, बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची लढाई, मानवी आरोग्यावरील हवामान बदलाचा परिणाम यासारख्या जागतिक समस्येवर आपले मत मांडले.
World Health Organisation: ओमायक्रॉनला कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट मानने धोकादायक ; डब्ल्यूएचओचा इशारा - डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अदहानोम गेब्रेयेसस
डब्ल्यूएचओ प्रमुखांनी (World Health Organisation chief) महामारीच्या समाप्तीच्या चर्चेबद्दल इशारा दिला आहे. ते म्हणाले की ओमायक्रॉन हे शेवटचे स्वरूप आहे किंवा साथीच्या रोगाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. यावर विश्वास ठेवणे धोकादायक विचार आहे.
ते म्हणाले, महामारीच्या प्राणघातक टप्प्याला संपवण्यासाठी आपली सामूहिक प्राथमिकता असली पाहिजे. गेब्रेयेसस डब्ल्यूएचओच्या कार्यकारी बोर्डच्या बैठकीच्या (Gabrieus told meeting WHO's executive board) सुरुवातीला म्हणाले, महामारी कोणते रुप धारण करेल आणि कसे गंभीर टप्पा संपवला जावा याच्यासाठी वेगवेगळे दृष्टीकोन आहेत. परंतु हे मानने धोकादायक असेल की, ओमायक्रॉनचा, वायरसचे शेवटचा स्वरुप असेल किंवा महामारी संपत आली आहे. ते म्हणाले, याच्या विपरित, जागतिक स्तरावर वायरस आणि त्याची स्वरुपे येण्यासाठी एक आदर्श अवस्था उपस्थित आहे.
गेब्रेयेसस यांनी जोर देऊन सागितले की, कोविड-19 महामारीला दिलेली जागतिक आरोग्य आणीबाणीची स्थिती आपण संपवू शकतो आणि हे आपण या वर्षीच करु शकतो. हे WHO च्या उद्दिष्टांची पूर्तता (The purpose of the WHO) करते, जसे की वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील ७० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करणे, कोविड-19 चा जास्त धोका असलेल्या लोकांवर लक्ष केंद्रित करणे, चाचणी सुधारणे आणि विषाणू आणि त्याच्या प्रकारांचा मागोवा घेण्यासाठी अनुवांशिक अनुक्रमे दर वाढवून साध्य करु शकतो.