महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

आम्ही स्पष्ट बहुमताने निवडणूक जिंकणार आहोत : बिडेन

डेमोक्रॅटिक उमेदवार जो बिडेन यांनी स्पष्ट केले आहे की, ते स्पष्ट बहुमताने ही मत-शर्यत जिंकणार आहेत. सध्या बिडेन जॉर्जिया, नेवाडा, पेन्सिल्वानिया आणि अ‌ॅरिझोना या प्रांतांत आघाडीवर आहेत. ते अध्यक्षपदाच्या अगदी जवळ दिसत आहेत. ते ट्रम्प यांच्या तुलनेत मोठ्या फरकाने पुढे आहेत.

जो बिडेन लेटेस्ट न्यूज
जो बिडेन लेटेस्ट न्यूज

By

Published : Nov 7, 2020, 6:27 PM IST

वॉशिंग्टन - नोव्हेंबरमध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालावरून वाढत्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिक उमेदवार जो बिडेन यांनी स्पष्ट केले आहे की, ते स्पष्ट बहुमताने ही मत-शर्यत जिंकणार आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपण विजयी होणारच अशी घोषणा केलेली नाही.

शुक्रवारी रात्री टेलिव्हिजन दिलेल्या भाषणात बिडेन म्हणाले की, 'आम्हाला 7.4 कोटींहून अधिक मते मिळाली आहेत, जी अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्रपतींना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त आहेत.'

एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, माजी उपराष्ट्रपती म्हणाले की, बिडेन / हॅरिस निश्चितपणे 300 हून अधिक इलेक्टोरल कॉलेज मते जिंकत आहेत. पारंपरिक रिपब्लिकन राज्ये असलेल्या अ‌ॅरिझोना आणि जॉर्जियामध्येही हे घडत आहे. आम्ही ही शर्यत स्पष्ट बहुमताने जिंकू.

हेही वाचा -बायडेन यांना विजयाचा विश्वास, म्हणाले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी पहिली जबाबदारी आहे की..

कोविड - 19 महामारीच्या प्रसारात सर्व देशभर भयावह वाढ झाल्याबद्दल बिडेन म्हणाले की, ते 'राष्ट्रपती पदाच्या पहिल्याच दिवशी' याच्यावर योग्य कारवाई करतील. 'कठीण निवडणुकां'नंतर तणाव वाढला, हे मान्य करत त्यांनी अमेरिकन जनतेला' संताप व निषेध रोखण्याचे' आवाहन केले.

'आम्हाला गंभीर समस्या आहेत, पक्षपातपूर्ण युद्धामध्ये वाया घालवण्यास आपल्याकडे जास्त वेळ नाही. आम्ही विरोधक असू शकतो, पण आम्ही शत्रू नाही. तुमचे मत नक्कीच मोजले जाईल, मला किती लोक रोखण्याचा प्रयत्न करतात याने मला काहीह फरक पडत नाही,' असे माजी उपराष्ट्रपतींनी म्हटल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

सध्या बिडेन जॉर्जिया, नेवाडा, पेन्सिल्वानिया आणि अ‌ॅरिझोना या प्रांतांत आघाडीवर आहेत. ते अध्यक्षपदाच्या अगदी जवळ दिसत आहेत. ते ट्रम्प यांच्या तुलनेत मोठ्या फरकाने पुढे आहेत.

हेही वाचा -बायडेन यांनी रचला इतिहास; इतिहासातील सर्वाधिक मतं मिळवणारे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार

ABOUT THE AUTHOR

...view details