रियो डी जनैरो - ब्राझीलच्या राजधानीमधील जगप्रसिद्ध येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याला मास्क घालण्यात आला होता. या पुतळ्यावर मास्कचे छायाचित्र 'प्रोजेक्ट' करुन, हा व्हर्च्युअल मास्क घालण्यात आला. कोरोनाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एका विशेषज्ञांच्या पथकाने हा अनोखा पर्याय अवलंबला होता.
'टोडोस पेला सॉडे' (आरोग्यासाठी सर्व) या मोहीमेअंतर्गत हे करण्यात आले होते. देशाच्या विविध भागांमधील विशेषज्ञांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी ही मोहीम पुकारली आहे. या विषाणूबाबत लोकांमध्ये जागृती करुन, त्यांना स्वसुरक्षा बाळगण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
यावेळी या पुतळ्यावर #MascaraSalva (मास्क-सेव्ह्स) असा हॅशटॅगही झळकवण्यात आला होता. सोबतच, मास्क घातल्याने आपला जीव वाचू शकतो अशा आशयाचा संदेश यामधून देण्यात आला होता.