वॉशिंग्टन– चीन आणि भारतामधील तणावाच्या स्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अप्रत्यक्षपणे मध्यस्थ होण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत. चीन आणि भारतामधील लोकांच्या शांतीसाठी सर्व शक्य ते प्रयत्न करण्याची ट्रम्प यांची इच्छा असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.
पूर्व लडाखमधील सीमारेषेवर तणावाची स्थिती असताना गेली काही आठवडे ट्रम्प प्रशासनाने भारताला चीनविरोधात सातत्याने पाठिंबा दिला आहे. भारत-चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये तणावाची स्थिती असल्याच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ट्रम्प यांच्या प्रवक्त्याने उत्तर दिले आहे. भारतीय लोकांवर माझे प्रेम आहे, असे ट्रम्प यांनी म्हटल्याचे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव मॅकननी यांनी सांगितले. चीनमधील लोकांवर प्रेम आहे. दोन्ही देशांमधील लोकांच्या शांततेसाठी सर्व शक्य प्रयत्न करण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे.