वॉशिंग्टन डी. सी - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Ukraine-Russia conflict ) पुकारलं आहे. रशियन सैन्याविरोधात युक्रेनचे सैन्य निकाराने लढा देत आहेत. रशियाने सुरु केल्या या युद्धाचे पडसाद सुंपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. अनेक देशांनी रशियाच्या या लष्करी कारवाईचा निषेध केला असून रशियावर विविध निर्बंध लादण्यात येत आहेत. या युद्धात अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायेडन सैनिकी हस्तक्षेप करणं टाळत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकाने सध्या सुरू असलेल्या युक्रेन-रशिया संघर्षात युक्रेनला ( US President Joe Biden support Ukraine ) पाठिंबा दिला आहे. पण, तसेच अमेरिकेन सैन्य रशियन सैन्याविरोधात लढणार नसल्याचे बायडेन यांनी म्हटलं. आज सकाळी त्यांनी आपल्या पहिल्या स्टेट ऑफ युनियन भाषणादरम्यान हे वक्तव्य केले.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मुक्त असलेल्या जगाचा पाया हलवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी नाटो युतीची निर्मिती करण्यात आली. आता रशिया आणि युक्रेनच्या संघर्षात अमेरिका युक्रेनच्या पाठीशी उभी आहे. पण, रशियाविरोधात अमेरिकन सैन्य मैदानात उतरणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अमेरिकेने आपल्या हवाई हद्दीतून रशियन विमानांना बंदी घातल्याचेही बायडेन यांनी जाहीर केले.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने टेक दिग्गज अॅपल कंपनीने मंगळवारी रशियामधील सर्व उत्पादनांची विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे. तसेच कॅनडाने रशियन जहाजे, बंदरे, पाण्यातून मासेमारी नौकांवर बंदी घातली आहे.