वॉशिंग्टन- अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इराणकडून तेल आयात थांबवा, असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी भारतासह इतर देशांना दिला आहे.
आर्थिक निर्बंधाचा हेतू हा इराणचा शांततेला असलेला धोका जगाच्या नजरेत अधिक व्यापकपणे असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इराणवरील भूमिकेबाबत पॉम्पेओ यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की इराणच्या राज्यकर्त्यांनी तडजोडीसाठी टेबलवर चर्चा करायला हवी. यापूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात करण्यात आलेल्या सौद्याहून अधिक सौदा करण्यात यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.