वॉशिंग्टन: अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णांनी मंगळवारी दहा लाखांचा टप्पा ओलांडला. तर, देशातील कोरोनाच्या बळींची संख्याही ५८,३०० वर पोहोचली आहे. यामुळे आता अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या ही जगभरातील रुग्णांच्या एक तृतियांश झाली आहे, तर बळींची संख्या जगातील बळींच्या एक चतुर्थांश झाली आहे.
अमेरिकेतील एकूण कोरोनाच्या बळींची संख्या, ही आता तब्बल दोन दशके (१९५५-१९७५) चाललेल्या व्हिएतनाम युद्धातील बळींपेक्षाही जास्त झाली आहे. यूएस नॅशनल अर्काईव्ह्ज नुसार, व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकेच्या ५८,२२० सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा प्रभाव लवकरच कमी होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. न भूतो न भविष्यती अशा संकटाला आपण तोंड देत आहोत. मात्र, शेवटी विजय आपलाच होणार आहे. अमेरिका ही पुन्हा एकदा सुरक्षितरित्या आणि लवकरात लवकर पुढे येईल, असे ते व्हाईट हाऊसमधील एका कार्यक्रमात म्हटले.