महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 4, 2020, 6:15 PM IST

ETV Bharat / international

एकाचवेळी दोन रुग्णांना होणार व्हेंटिलेटरचा लाभ

अमेरिकेन विद्यापीठातील एका टीमने व्हेंटिलेटर 'स्प्लिटर्स' विकसीत केले आहे. या यंत्रांमुळे डॉक्टरांना एकच व्हेंटिलेटर दोन रुग्णांसाठी वापरता येईल.

व्हेंटिलेटर 'स्प्लिटर्स
व्हेंटिलेटर 'स्प्लिटर्स

वॉशिग्टंन - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना साथीच्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. यावर मात करण्यासाठी अमेरिकेन विद्यापीठातील एका टीमने व्हेंटिलेटर 'स्प्लिटर्स' विकसीत केले आहे. या यंत्रांमुळे डॉक्टरांना एकच व्हेंटिलेटर दोन रुग्णांसाठी वापरता येईल.

निव्हर्सिटी ऑफ नॉर्थ टेक्सास येथील इंजिनीअरिंगची एक टीम व्हेंटिलेटर स्प्लिटर्स करण्यासाठी 3 डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वापरत आहे. दोन समान पातळीवरच्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान उपयोगात आणता येणार आहे.

निर्जंतुकीकरण करता येण्याजोग्या बायोकम्पॅन्सिबल (जैववैद्यकीय) सामग्रीचा वापर करून महाविद्यालयाच्या डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग लॅबमध्ये 20 स्प्लिटर्स तयार केले आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी डीन एंड्री वोवोडिन म्हणाले की, स्प्लिटर्स मॉडेलची हॉस्पिटलच्या व्हेंटिलेटरवर तपासणी केल्यानंतर टीमने डिझाइनमध्ये बदल केला आणि अवघ्या दोन दिवसात ते तयार केले.

ABOUT THE AUTHOR

...view details