वॉशिंग्टन : आंततराष्ट्रीय स्तरावर चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिका सरकार नवनवीन शक्कल लढवत आहे. आता विकसनशील देशांनी चिनी बनावटीचे मोबाईल फोन वापरू नयेत यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. यासाठी या देशांना आर्थिक मदत देण्याची तयारीही अमेरिका सरकारने दाखवली आहे.
चीनमध्ये मोबाईल आणि मोबाईल बनवण्यासाठी लागणारे सुटे भाग हे स्वस्तात मिळतात. त्यामुळे विकसनशील देश यासाठी चीनला प्राधान्य देतात. विकसनशील देशांनी चीनऐवजी इतर देशांमधून मोबाईल आणि तत्सम साहित्य घ्यावे यासाठी अमेरिका कित्येक देशांना कोट्यवधी डॉलर्सचे कर्ज देण्यास तयार आहे. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जनरल या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली.