वॉशिंग्टन - अफगाणिस्तानातून अमेरिकन नागिरकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. 31 ऑगस्ट पर्यंत निर्वासन पूर्ण करण्यावर अमेरिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या एप्रिलमध्ये राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्य मागे घेण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती. जी आधी सप्टेंबर होती. परंतु नंतर ती 31 ऑगस्ट करण्यात आली.
अमेरिकन सैन्याकडून निर्वासन मोहीम सुरू असून त्यांना दहशतवादाचा धोका अद्याप आहे. निर्वासन मोहीमेची शेवटची तारिख जवळ येत आहे, तसे दिवसेंदिवस संकट वाढत चालले आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन सासाकी यांनी म्हटलं. अफगाणिस्तानातून फक्त सैन्य माघारी येत नसून शस्त्र उपकरणे सुद्धा हलवण्यात येत आहेत. हा सहसा कोणत्याही मोहिमेचा एक अतिशय धोकादायक भाग असतो. आयएसआयएसकडून धोका असतानाही सैनिक काम करत असून परिस्थितीचा सामना करत आहेत, असे त्या म्हणाल्या.
राजनैतिक प्रयत्न -
अफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जो बायडेन कटीबद्ध आहेत. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात येईल आणि निर्वासन मोहीम 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यावर फोकस आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच अफगाणिस्तानात अडकलेल्या इतर राष्ट्राच्या नागरिकांना आणि व्हिसा असलेल्या अफगाणिस्तानांना बाहेर काढण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू ठेवण्याचे निर्देश जो बायडेन यांनी राज्य सचिवांना दिले आहेत.
105,000 जणांना बाहेर काढले -
तालिबानवर अमेरिकाचा विश्वास नाही. मात्र, तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानरव ताबा मिळवला आहे. त्यामुळे निर्वासन मोहीम पूर्ण करण्यासाठी आणि तेथून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तालिबान्यांसोबत चर्चा सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आतापर्यंत अमेरिकेने 105,000 जणांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा- आत्मघातकी हल्ल्यानंतर आज पुन्हा अमेरिकेकडून निर्वासन उड्डाणे तातडीने सुरू