वॉशिंग्टन -अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एफ -35 लढाऊ विमानांच्या संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) च्या विक्री करण्यास मान्यता दिली. यावर काही कॉंग्रेस डेमोक्रॅटनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
मंगळवारी दिलेल्या निवेदनात, परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी अंदाजे 23.37 अब्ज अमेरिकन डॉलर्स किंमतीचे शस्त्रास्त्र विक्रीचे पॅकेज जाहीर केले. यात 10.4 अब्ज डॉलर्स किंमतीचे 50 एफ-35 जेट आणि 2.97 अब्ज डॉलर्सचे 18 एमक्यू-9 बी ड्रोन आणि 10 अब्ज डॉलर्स किंमतीची युद्ध सामुग्री समाविष्ट आहे.
'प्रस्तावित विक्री युएईला अमेरिकन मित्रपक्षांशी परस्पर व्यवहार करण्यास अधिक सक्षम बनवेल. इस्रायलची गुणात्मक लष्करी बाजू सक्षम करण्यासाठी अमेरिका दीर्घकाळासाठी प्रतिबद्ध आहे. यानुसारच हे पाऊलही आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -मेक्सिकोमध्ये कोसळधार! भूस्खलन आणि पूरात 27 लोकांचा मृत्यू