वॉशिंग्टन – टिकटॉकच्या शेअर विक्रीत अमेरिकेला मोठा हिस्सा मिळावा, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यांनी टिकटॉकला अमेरिकेच्या व्यवसायामधून बाहेर पडण्याची 15 सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी सोमवारी संवाद साधला. ते म्हणाले, की चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला तुमची मुले कुठे आहेत, हे माहित आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही टिकटॉकला साईन केल्याने तुमचे नाव आणि पासवर्ड त्यांना कळते. टिकटॉकमध्ये किमान 30 टक्क्यांहून कमी हिस्सा खरेदी करू नये, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कंपनीमधील कमी हिस्सा म्हणजे भाडेकरू असल्यासारखे आहे. भाडेकरुला किंमत नसते, असे ट्रम्प यांनी म्हटले. टिकटॉकच्या खरेदीबाबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली आहे.