महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

आता खोकल्याची गोळी रोखणार कोरोनाचा प्रसार - कोविड-१९ प्रसार रोखणे

सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी नवीन प्रकारची खोकल्याची गोळी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सांगितले की लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी ही गोळी घ्यावी. ही गोळी खोकताना किंवा शिंकताना हवेत हवेत पसरणाऱ्या थेंबाना रोखू शकते.

US researchers working on special 'cough drops' to curb COVID-19 spread
आता खोकल्याची गोळी रोखणार कोरोनाचा प्रसार..

By

Published : May 16, 2020, 6:01 PM IST

हैदराबाद -कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेतील संशोधक एक नवीन प्रकारचे खोकल्याचे औषध (टॅब्लेट) विकसित करीत आहेत. ही टॅब्लेट घेतल्यानंतर व्यक्तीच्या तोंडातील लाळ घट्ट होते आणि जीभेच्या पृष्ठभागावर चिकटुन राहते.

सामाजिक अंतर आणि मास्क वापरण्याचे काटेकोर पालन केले तर कोरोना विषाणूचा प्रसार लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतो. परंतु सध्या अनेक ठिकाणी लॉकडाउनवरील निर्बंध हळूहळू हटविण्यात येत आहेत. त्यामुळे कार्यालये, शाळा, दुकाने आणि रुग्णालये याठिकाणी सामाजिक अंतर राखणे अशक्य होईल, असे संशोधक म्हणाले.

ही परिस्थिती लक्षात घेऊन सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांनी नवीन प्रकारची खोकल्याची गोळी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सांगितले की लोकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी ही गोळी घ्यावी. ही गोळी खोकताना किंवा शिंकताना हवेत हवेत पसरणाऱ्या थेंबाना रोखू शकते. त्यांनी केलेल्या प्रारंभिक प्रयोगानुसार, जर एखाद्या व्यक्तीने मास्क घातला असेल आणि घराबाहेर पडण्यापूर्वी ही गोळी खाल्ली असेल, तर कोरोनाला रोखण्यासाठी २ मीटर सामाजिक अंतर पुरेसे आहे. ही गोळी घेतल्याने खोकताना तोंडातील थेंबांचा प्रसार कमी कसा होतो हे शोधण्यासाठी त्यांनी हाय-स्पीड कॅमेर्‍याचा वापर केला आहे.

हेही वाचा -लोकांचे आयुर्मान वाढले परंतु कोविड-१९चा धोका तसाच : डब्ल्यूएचओ रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details