महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेत मतदानाच्या दिवशी कोरोनाचा हाहाकार; आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद

यंदाच्या वर्षी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडत मतदान केले. मात्र, याच दिवशी अमेरिकेत आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोच्च एकदिवसीय रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेत ९.४ दशलक्ष कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

US reports its second-highest number of new COVID-19 cases on Election Day
अमेरिकेत मतदानाच्या दिवशी कोरोनाचा हाहाकार; आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद

By

Published : Nov 5, 2020, 7:23 AM IST

वॉशिंग्टन डीसी :अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणूक सुरू आहे. यंदाच्या वर्षी अमेरिकेत मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडत मतदान केले. मात्र, याच दिवशी अमेरिकेत आतापर्यंतच्या दुसऱ्या सर्वोच्च एकदिवसीय रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकेत ९.४ दशलक्ष कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

लोक करतायत नियमांचे उल्लंघन

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (सीडीसी)ने यासाठी लोकांच्या वागणुकीला जबाबदार ठरवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन लोक करत नाहीत, त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे सीडीसीने म्हटले आहे.

कोरोना बाधितांनाही मतदानाची परवानगी

कोरोना बाधित रुग्णांनाही मंगळवारी बाहेर पडून मतदान करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. यासोबतच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना त्यांनी आपल्या आजाराबाबत सांगणे बंधनकारक होते.

हेही वाचा :डोनाल्ड ट्रम्प यांचाच होणार विजय, रॉबर्ट कॅहली यांचे भाकित

ABOUT THE AUTHOR

...view details