वॉशिंग्टन - संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1 हजार 754 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेत कोरोनाचे थैमान, गेल्या 24 तासात 1 हजार 754 जणांचा मृत्यू
कोरोनाचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेमध्ये गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1 हजार 754 जणांचा मृत्यू झाला आहे. जॉन हॉपकिन्सकडून ही माहिती देण्यात आली आहे.
अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत ८० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १२ लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचा फैलाव होण्यासाठी चीनला जबाबदार धरले आहे. चीनच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अमेरिका हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जागतिक स्तरावर अग्रस्थानी आहे. तरीही एका विषाणूने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. महासत्ता असलेला देश प्रथमच एवढा संघर्ष करताना दिसत आहे. अमेरिकेस कोरोनाचा सामना करताना कमालीचे अपयश आले आहे. तर कोरोनामुळे कोट्यवधी नागरिकांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागतिक व्यापार, पर्यटन, प्रवासी वाहतूक आणि उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत.