महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : बायडेन विजयाच्या दिशने... डेमोक्रॅटिकला यांना 238 तर रिपब्लिकनला मिळाले 213 इलेक्टोरल व्होट्स - US result LIVE update

US presidential election results LIVE updates
अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : निकालाचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर..

By

Published : Nov 4, 2020, 6:31 AM IST

Updated : Nov 5, 2020, 7:37 AM IST

16:14 November 04

सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्यावर डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली. मतमोजणी थांबवण्याविरोधात आम्ही लढू. डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे अपमानजनक, अभूतपूर्व आणि चुकीचे आहेत, असे डेमोक्रॅटिक पक्षाने म्हटले आहे.

13:24 November 04

अ‌ॅरिझोनामध्ये बायडेन विजयी..

अ‌ॅरिझोना राज्यामध्ये बायडेन यांना विजय मिळाला आहे. यानंतर बायडेन यांच्या एकूण इलेक्टोरल व्होट्सची संख्या २३६ झाली आहे.

13:07 November 04

मतदान थांबले नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ - ट्रम्प

मतदान थांबले नाही तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ - ट्रम्प

सध्या सुरु असलेले सर्व मतदान थांबवले जायला हवे. निर्धारीत वेळेनंतर आलेले एकही बॅलोट मतमोजणीसाठी ग्राह्य धरले जाऊ नये, अन्यथा आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ असे डोनाल्ड ट्र्म्प म्हणाले. माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास, मी जिंकलोच आहे असेही ते यावेळी म्हणाले.

13:01 November 04

ट्रम्पना मतदान केलेल्या सर्व नागरिकांचे आभार - पेन्स

डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर उपाध्यक्ष माईक पेन्स यांनीही ट्रम्प यांना मतदान केलेल्या नागरिकांचे आभार मानले.

12:56 November 04

आघाडी असलेल्या राज्यांमध्ये विजयी होण्याचा विश्वास..

डोनाल्ड ट्रम्प हे सध्या जॉर्जिया, मिशिगन आणि इतर काही राज्यांमध्ये आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये अद्याप मतमोजणी पूर्ण झाली नाही, मात्र सध्याची आकडेवारी पाहता ही राज्ये आपण जवळपास जिंकल्यातच जमा आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

12:51 November 04

ट्रम्प यांनी मानले मतदारांचे, कुटुंबीयांचे आणि उपाध्यक्षांचे आभार..

ट्रम्प यांनी मानले मतदारांचे, कुटुंबीयांचे आणि उपाध्यक्षांचे आभार..

आपल्याला दिलेल्या पाठिंब्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मतदारांचे, कुटुंबीयांचे आणि उपाध्यक्षांचे आभार मानले आहेत. ते नागरिकांना संबोधित करत होते.

12:03 November 04

नेव्हाडामध्ये बायडेन पुढे..

नेव्हाडामध्ये काही वेळापूर्वीच मतमोजणीस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार बायडेन आघाडीवर आहेत.

11:37 November 04

ट्रम्प यांची जोरदार मुसंडी; फ्लोरिडापाठोपाठ टेक्सासमध्येही विजयी..

डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडापाठोपाठ टेक्सास राज्यातही विजय नोंदवला आहे. टेक्सासमध्ये ३८ इलेक्टोरल व्होट्स आहेत. यानंतर ट्रम्प यांच्या एकूण इलेक्टोरल व्होट्सची संख्या २१२वर पोहोचली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी बायडेन यांना आतापर्यंत २२३ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

11:34 November 04

बायडेन यांची गाडी २२३ वर अडकली; ट्रम्पना मोठी आघाडी

डोनाल्ड ट्रम्पना आतापर्यंत एकूण १७४ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर, बऱ्याच वेळापासून बायडेन यांची गाडी २२३ व्होट्सवर अडकून आहे.

11:30 November 04

फ्लोरिडामध्ये ट्रम्प विजयी..

बीबीसी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार फ्लोरिडा या महत्त्वाच्या आणि मोठ्या राज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय प्राप्त केला आहे. फ्लोरिडामध्ये २९ इलेक्टोरल व्होट्स आहेत.

11:29 November 04

मतदानाची वेळ संपल्यानंतरची मते ग्राह्य नसावीत - ट्रम्प

मतदानाची वेळ झाल्यानंतर येणाऱ्या मतांना ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

11:26 November 04

विश्वास ठेवा, आपण जिंकू - बायडेन

जो बायडेन यांनी काही वेळापूर्वी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या समर्थकांना सांगितले, की विश्वास ठेवा आपण हे (निवडणूक) जिंकू. सध्या बहुतांश राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर दिसून येत आहेत. मात्र, प्रत्येक मत मोजले जाईपर्यंत हे संपले आहे असे समजू नका, असेही बायडेन यावेळी म्हणाले.

10:51 November 04

ट्रम्प यांची मुसंडी; आतापर्यंत मिळवले एकूण १४५ इलेक्टोरल व्होट्स

डोनाल्ड ट्रम्प यांना आतापर्यंत एकूण १४५ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर बायडेन यांना आतापर्यंत २२३ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. 

10:43 November 04

बायडेनची घोडदौड सुरुच; आतापर्यंत मिळाले २१३ व्होट्स

बायडेन यांची घोडदौड सुरुच आहे. आतापर्यंत त्यांना २१३ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

10:23 November 04

'स्विंग स्टेट्स'मध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर..

निवडणुकीत महत्त्वाच्या ठरणाऱ्या बऱ्याच राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. यामध्ये फ्लोरिडा, जॉर्जिया, लोवा, मिशिगन, नॉर्थ कॅरोलिना, ओहायो, पेन्सिल्वेनिया, टेक्सास आणि व्हिस्कॉन्सिनचा समावेश आहे. तर, न्यू हेम्पशायर आणि अ‌ॅरिझोनामध्ये बायडेन पुढे आहेत. नेव्हाडा राज्यातील मतमोजणीस अद्याप सुरुवात झाली नाही.

10:17 November 04

हवाईमध्ये झाले रेकॉर्डब्रेक मतदान

हवाईमध्ये यंदा गेल्या निवडणुकांच्या तुलनेत २० टक्के अधिक मतदानाची नोंद झाली. यावेळी ५ लाख २६ हजार २२५ लोकांनी मतदान केले.

09:41 November 04

बायडेन यांचे इलेक्टोरल व्होट्स २००च्या पुढे..

बायडेन यांना आतापर्यंत २०९ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर, ट्रम्प यांना आतापर्यंत ११८ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

09:40 November 04

वॉशिंग्टन, कॅलिफोर्नियामध्ये बायडेन विजयी..

जो बायडेन यांना वॉशिंग्टन, ओरिगॉन, कॅलिफोर्निया आणि इलिनॉईस या राज्यांमध्ये विजय मिळाला आहे. कॅलिफोर्नियामध्ये ५५, ओरिगॉनमध्ये सात, तर वॉशिंग्टनमध्ये १२ इलेक्टोरल व्होट्स आहेत.

09:33 November 04

निकालाची वाट बघत आंदोलक रस्त्यावर..

निकालाची वाट बघत आंदोलक रस्त्यावर..

वॉशिंग्टन :अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल सध्या जाहीर होत आहेत. या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन डीसीच्या बीएलएम प्लाझामध्ये कित्येक आंदोलक रस्त्यावर आले आहेत. पोलिसांनी या आंदोलकांना थांबवण्यासाठी सायकलींचा वापर केला.

09:10 November 04

अमेरिकेच्या पहिल्या ट्रान्सजेंडर स्टेट सेनेटरची डेलावेअरमधून निवड..

डेमोक्रॅट पक्षाकडून उभ्या असलेल्या सारा मॅक्ब्राईड यांचा डेलावेअरमधून विजय झाला आहे. शपथविधीनंतर अमेरिकेतील पहिल्या ट्रान्सजेंडर स्टेट सेनेटर होण्याचा मान त्यांना मिळणार आहे. सारा यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे स्टीव्ह वॉशिंग्टन उभे होते.

09:05 November 04

डोनाल्ड ट्रम्पना १०८ इलेक्टोरल व्होट्स

सकाळी नऊ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार) डोनाल्ड ट्रम्पना १०८ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर जो बायडेन यांना १३१ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

08:17 November 04

मोठ्या राज्यांमध्ये ट्रम्प आघाडीवर..

फ्लोरिडा, टेक्सास, ओहायो अशा मोठ्या राज्यांमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये अनुक्रमे २९, ३८ आणि १८ इलेक्टोरल व्होट्स आहेत.

08:03 November 04

बायडेन यांना मिळाले १३१ इलेक्टोरल व्होट्स..

जो बायडेन यांना आतापर्यंत १३१ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

07:58 November 04

डोनाल्ड ट्रम्पना साऊथ आणि नॉर्थ डकोटामध्ये विजय; तर कोलोराडो आणि कनेक्टिकटमध्ये बायडेन विजयी

डोनाल्ड ट्रम्प यांना साऊथ डकोटा आणि नॉर्थ डकोटामध्ये विजय मिळाला आहे. तर, कोलोराडो आणि कनेक्टिकट राज्यामधील नागरिकांनी बायडेन यांना पसंती दर्शवली आहे.

07:49 November 04

जो बायडेन यांना ११९ इलेक्टोरल व्होट्स

जो बायडेन यांना आतापर्यंत ११९ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर, डोनाल्ड ट्रम्पना ९२ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

07:42 November 04

डोनाल्ड ट्रम्पना अर्कान्सासमध्ये विजय, तर न्यूयॉर्कमध्ये बायडेन विजयी

डोनाल्ड ट्रम्प यांना अर्कान्सासमध्ये विजय मिळाला आहे. तर, न्यूयॉर्कवासियांनी जो बायडेन यांना पसंती दर्शवली आहे.

07:07 November 04

डोनाल्ड ट्रम्पना ६१ इलेक्टोरल व्होट्स

डोनाल्ड ट्रम्पना आतापर्यंत ६१ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांना ८५ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

07:06 November 04

टेनेसीमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी..

टेनेसी राज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पना विजय मिळाला आहे. टेनेसीमध्ये ११ इलेक्टोरल व्होट्स आहेत.

06:45 November 04

ओल्काहोमा, इंडियानामध्ये ट्रम्प; तर न्यू-जर्सीमध्ये बायडेन विजयी..

केंचुकीसोबतच डोनाल्ड ट्रम्प हे ओल्काहोमा आणि इंडियाना राज्यांमध्येही विजयी झाले आहेत. तर, जो बायडेन यांना व्हर्मोंटसह मॅसाचुसेट्स, न्यू-जर्सी आणि मेरिलँडमध्ये विजय मिळाला आहे.

06:32 November 04

फ्लोरिडा आणि जॉर्जियामध्ये चुरशीची लढत..

काही वेळापूर्वी फ्लोरिडामध्ये आघाडीवर असलेले बायडेन आता पिछाडीवर गेले आहेत. तर, जॉर्जियामध्ये आघाडीवर असलेले ट्रम्प आता मागे पडले आहेत.

06:31 November 04

बायडेन यांना ८५, तर ट्रम्पना ५५ इलेक्टोरल व्होट्स

असोसिएट प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बायडेन यांना ८५ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर, डोनाल्ड ट्रम्प यांना ५५ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

06:29 November 04

वेस्ट व्हर्जिनियामध्ये ट्रम्पना पसंती

पाच इलेक्टोरल व्होट्स असणाऱ्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील लोकांनी ट्रम्पना आपली पसंती दर्शवली आहे.

06:29 November 04

व्हर्जिनियामध्ये बायडेन विजयी..

तेरा इलेक्टोरल व्होट्स असणाऱ्या व्हर्जिनिया राज्यात डेमोक्रॅटिकच्या बायडेन यांचा विजय झाला आहे.

06:23 November 04

फ्लोरिडामध्ये बायडेन, तर जॉर्जियामधून ट्रम्प आघाडीवर

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिडा राज्यात जो बायडेन (४९.९ टक्के मते) आघाडीवर आहेत. तर, जॉर्जिया राज्यातून डोनाल्ड ट्रम्प (५१.७ टक्के मते) पुढे आहेत.

06:20 November 04

आतापर्यंत बायडेनना १६, तर ट्रम्पना १३ इलेक्टोरल व्होट्स

असोसिएट प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत जो बायडेन यांना १६ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. तर, डोनाल्ड ट्रम्पना १३ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत.

06:19 November 04

डोनाल्ड ट्रम्प केंचुकीमध्ये विजयी

डोनाल्ड ट्रम्प यांनी केंचुकी राज्यात विजय मिळवला आहे. केंचुकीमध्ये आठ इलेक्टोरल व्होट्स आहेत. (असोसिएट प्रेस) 

06:17 November 04

व्हर्मोंटमध्ये जो बायडेन विजयी..

असोसिएट प्रेस (एपी)ने दिलेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी व्हर्मोंट राज्यामध्ये विजय निश्चित केला आहे. व्हर्मोंटमध्ये तीन इलेक्टोरल व्होट्स आहेत.

06:14 November 04

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : निकाल येण्यास सुरुवात

वॉशिंग्टन : अमेरिकेत ४५व्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले. काही राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया अजूनही सुरू आहे. मात्र, ज्या राज्यांमधील मतदान पूर्ण झाले आहे तेथील निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. या दोघांनाही विजयासाठी २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे.

Last Updated : Nov 5, 2020, 7:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details