महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

भारत-पाकिस्तान संबंध भयानक स्थितीत - डोनाल्ड ट्रम्प

पुलवामा हल्ल्यानंतर भारत खूपच कठोर भूमिका घ्यायच्या तयारीत आहे. त्यांचे ५० हून अधिक जवान हुतात्मा झालेत. त्यामुळे मी त्यांची स्थिती समजू शकतो. दोन्ही देशांची स्थिती अत्याधिक बिकट होत चालली आहे. त्यामुळे दोन्ही देशांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

By

Published : Feb 23, 2019, 8:58 AM IST

ट्रम्प1

वॉशिंग्टन - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. यातच आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच भयानक स्थितीत असल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या स्थितीला भारत आणि पाकिस्तानमध्ये खूपच भयानक स्थिती आहे, दोन्ही देशातील वातावरण फारच बिघडले आहे. ही तणावाची परिस्थिती लवकरच समाप्त व्हावी. आमचे सरकार दोन्ही देशांच्या संपर्कात असून लवकर काश्मीर खोऱ्यात शातंता प्रस्थापित होण्याची आशा आहे. खूप साऱ्या लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. हे आता थांबले पाहिजे यासाठी आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे ट्रम्प म्हणाले.

भारत कठोर भूमिका घेणार

पुलवामा हल्ल्यानंतर भारत खूपच कठोर भूमिका घ्यायच्या तयारीत आहे. त्यांचे ५० हून अधिक जवान हुतात्मा झालेत. त्यामुळे मी त्यांची स्थिती समजू शकतो. दोन्ही देशांची स्थिती अत्याधिक बिकट होत चालली आहे. त्यामुळे दोन्ही देशांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

पाकिस्तानला अमेरिकेकडून दरवर्षी मिळत असलेली १.३ अब्ज डॉलरची मदत आम्ही बंद केली आहे. आम्ही सध्या पाकिस्तानसोबत काही बैठकांचे आयोजन करत आहोत. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानला अमेरिकेकडून खूप काही मदत मिळाली आहे. त्यांनी मात्र, आम्हाला हवी आहे त्यापद्धतीने मदत केली नसल्याने त्यांना वार्षिक देण्यात येणारी १.३ अब्ज डॉलरची मदत आम्ही रोखली आहे, असे ट्रम्प म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details