महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ट्रम्प यांनी व्यक्त केली कृतज्ञता, म्हणाले...'ही मदत विसरली जाणार नाही'

भारताकडे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन डोसची मदत अमेरिकेला केली आहे. यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत.

US President Donald Trump expressed gratitude to India and PM Modi
US President Donald Trump expressed gratitude to India and PM Modi

By

Published : Apr 9, 2020, 8:21 AM IST

वाशिंग्टन - जगभरामध्ये कोरोना विषाणून थैमान घातले असून सर्वांत जास्त कोरोनाबाधित सद्यपरिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये आढळले आहेत. भारताकडे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन डोसची मदत अमेरिकेला केली आहे. यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे आभार मानले आहेत.

कठीण काळात मैत्रीमध्ये सहकार्यची भावना असणे गरजेचे असते. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतातील नागरिकांचे आभार. हे कधीच विसरली जाणार नाही. कोरोनाविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतेला मदत केली आहे. या भक्कम नेतृत्वाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो, असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे.

यापूर्वी भारताने जर हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही, तर आम्ही भारताचा सूड घेऊ, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. भारताने अमेरिकेला हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषध देण्याची तयारी दर्शवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महान आहेत, असे ट्रम्प म्हणाले होते.

हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपायासाठी परिणामकारक सिद्ध ठरत आहे. अनेक रुग्णांवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला आहे. मलेरियासाठी वापरले जाणारे हायड्रोक्सिक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या रुग्णांसाठीही गुणकारी असल्याचे काही चाचण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यानंतर अमेरिकेने या औषधाची भारताकडे मागणी केली होती. मात्र, भारताने देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या औषधाच्या निर्यातीला बंदी आणली आहे. दरम्यान, अमेरिकेसोबतच आणखी काही देशांनीही या औषधाची मागणी भारताकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details