वॉशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि देशाच्या प्रथम महिला मेलियाना ट्रम्प हे अँड्र्यूजमधील हवाई दलाच्या तळावरून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ४.२५ च्या सुमारास ते जर्मनीला पोहोचतील. तेथे एक थांबा घेऊन, ते अहमदाबादसाठी रवाना होतील.
पहिल्यावाहिल्या भारत दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प रवाना.. - व्हाईट हाऊस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि देशाच्या प्रथम महिला मेलियाना ट्रम्प हे अँड्र्यूजमधील हवाई दलाच्या तळावरून भारतात येण्यासाठी रवाना झाले आहेत.

पहिल्यावाहिल्या भारत दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प रवाना..
पहिल्यावाहिल्या भारत दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प रवाना..
डोनाल्ड ट्रम्प यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. यामध्ये ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाला हजेरी लावतील. तसेच, साबरमती आश्रम आणि ताजमहालालाही भेट देतील. २४ आणि २५ फेब्रुवारी असे दोन दिवस ते भारत दौऱ्यावर असतील.
हेही वाचा :नमस्ते ट्रम्प : असा असणार अमेरिकेच्या अध्यक्षांचा भारत दौरा..
Last Updated : Feb 23, 2020, 9:58 PM IST