वॉशिंग्टन - रशिया आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने 8,500 सैनिकांना ( America Diployment In Nato ) सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन ( American President Jo Biden ) यांनी प्रमुख युरोपियन नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली असल्याचीही माहिती आहे. यासंदर्भात बोलताना पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी सांगितले की, सैन्य हे युक्रेनमध्ये नव्हे तर पूर्व युरोपमधील नाटो प्रदेशात तैनात केले जात आहे.
Russia Ukraine Tension : रशिया युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर नाटो प्रदेशात अमेरिकन सैन्य तैनात - Russia Ukraine Tension
रशिया आणि युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने 8,500 सैनिकांना ( America Diployment In Nato ) सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन ( American President Jo Biden ) यांनी प्रमुख युरोपियन नेत्यांशी यासंदर्भात चर्चा केली असल्याचीही माहिती आहे.
ब्रिटेनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नाटो प्रदेशात सैन्य तैनात करणे म्हणजे अमेरिकेची नाटो देशाप्रतीबद्धता दर्शवते, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
रशिया आणि युक्रेन या दोन देशातील तणावामुळे युक्रेनच्या भविष्यासह नाटोची विश्वासार्हताही धोक्यात आहे. कारण नाटो हे अमेरिकेच्या संरक्षण विषयक रणनितीमध्ये केंद्रस्थानी आहे. मात्र, पुतीन हे नाटोला रशियाच्या दृष्टीने धोकादायक मानतात. तसेच रशियाने युक्रेनवर कोणताही हल्ला करणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पाश्चिमात्य देशांकडून खोटे आरोप केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.