महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेतील आंदोलनाची धग कायम; पोलीस अधिकाऱ्याचा गोळी लागून मृत्यू - अमेरिका आंदोलन न्यूज

पोलीस अधिकारी हा लास वेगास येथे मृत्युमुखी पडल्याचे लास वेगास मेट्रो पोलिटीयन पोलीस विभागाने मंगळवारी म्हटले आहे.

Lasvegas
लासवेगास

By

Published : Jun 2, 2020, 6:12 PM IST

लास वेगास - अमेरिकेतील कृष्णवर्णीयांनी ट्रम्प प्रशासनाविरोधात केलेले आंदोलन पेटले आहे. निषेध करणाऱ्या आंदोलकांना नियंत्रणात आणताना एका पोलिसाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

पोलीस अधिकारी हा लास वेगास येथे मृत्युमुखी पडल्याचे लास वेगास मेट्रो पोलिटीयन पोलीस विभागाने मंगळवारी म्हटले आहे.

जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा माईनपोलीस याठिकाणी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. फ्लाईड हा गुडघ्यावर बसून पोलिसांसमोर श्वास घेता येत नसल्याचे सांगत होता. त्यावेळी एक श्वेतवर्णीय पोलीस फ्लाईडची छळवणूक करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून अमेरिकेत यावरून आगडोंब उसळला आहे. गेल्या तीन रात्री आंदोलन करणाऱ्या 338 जणांना अटक करण्यात आल्याचे लासवेगास पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी लास वेगासच्या रस्त्यावर आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा शनिवारी आणि रविवारी रात्री वापर केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात कृष्णवर्णीय लोकांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढल्याची भावना अमेरिकेत रुजत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातही अमेरिकेतील वातावरण आंदोलकांनी ढवळून काढले आहे

ABOUT THE AUTHOR

...view details