महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

भारत-चीन संघर्ष झाल्यास अमेरिका भारतासोबत, व्हाइट हाऊसची घोषणा - अमेरिकेचा भारताला पाठिंबा

भारत आणि चीनच्या संघर्ष झाल्यास अमेरिकेचे सैन्य भारतासोबत असेल, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

US military to stand with India in conflict with China
अमेरिकेचे सैन्य भारतासोबत व्हाईट हाऊस

By

Published : Jul 7, 2020, 9:14 AM IST

Updated : Jul 7, 2020, 11:17 AM IST

वाशिंग्टन - भारत आणि चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारतासोबत आहे, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले आहे. अमेरिकी नौदलाने आपली उपस्थिती वाढविण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन विमानवाहू जहाज तैनात केल्यानंतर व्हाईट हाऊसकडून ही माहिती देण्यात आली.

व्हाइट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफचे प्रमुख मार्क मिडोज म्हणाले, यातून संदेश स्पष्ट आहे. सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली असल्याने जगात कोठेही चीन असो किंवा आणखी कुणी उद्दाम होऊ पाहात असेल तर, आम्ही त्याचे समर्थन करणार नाही.

अमेरिकेने दक्षिण चीन सागरात आपले दोन विमानवाहू जहाजे तैनात केली आहेत. आमच्याकडे अजूनही जगातील सर्वोत्कृष्ट शक्ती आहे, हे जगाला माहिती करुन देणे हे आमचे आमचे ध्येय आहे, असेही मिडोज म्हणाले.

चीन, दक्षिण चीन सागर आणि पूर्वी चीन सागर भागात प्रादेशिक वाद सुरू आहे. चीन दक्षिण चीन सागरावर आपला दावा करत आहे. व्हिएतनाम, फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवानच्या क्षेत्रातही त्यांनी आपला दावा केला आहे.

त्यांना सांगण्यात आले आहे की, मागच्या महिन्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत अनेक भारतीय जवानांना वीरमरण आले. यानंतर भारताने अनेक चिनी अॅप्सवर बंदी आणली. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पैंगोंग सो, गलवान खोरे, गोग्रा हॉट स्प्रिंगसहित पूर्व लडाखच्या अनेक भागांत मागील आठ आठवड्यांहून अधिक संघर्ष सुरू आहे.

दरम्यान, 15 जूनला गलवान खोऱ्यांत दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे 20पेक्षा अधिक जवानांना वीरमरण आले. तर कालपासून (सोमवार) गलवान खोरे आणि गोग्रा हॉट स्प्रिंग येथून चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी रविवारी फोनवरून संवाद साधला. यात ते सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैनिकांनी माघार घेण्याच्या प्रक्रियेत वेगात पूर्ण करण्यावर सहमती दर्शवली.

Last Updated : Jul 7, 2020, 11:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details